Uncategorized

ग्लोबल वार्मिंग व कचराच्या समस्या सोडविण्यासठी

लोकसहभाग महत्वाचा


शिरुर दिनांक ( वार्ताहर )
कचराची , सांडपाण्याची योग्य विल्हेवाट करणारे सुसंस्कृत असतात असे सांगून विविध जागतिक समस्या आपल्या दारा पर्यत पोहचल्या असून या समस्यांच्या निराकारणासाठी लोकसहभाग महत्वाचे असल्याचे प्रसिध्द लेखक व भवतालचे संस्थापक अभिजीत घोरपडे शिरुर येथे म्हणाले .


शिरुर येथे सनशाईन क्लबचा वतीने घोरपडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर , पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे ,प्रा . डॉ . राजेराम घावटे , प्रकाश बाफना आदी उपस्थित होते .


घोरपडे म्हणाले
समाज सुसंस्कृत होण्यासाठी देवाण घेवाणीची आवश्यकता असते. .जगात चांगले घेणारा जो समाज असतो तो पुढे जातो . ग्लोबल वार्मिग  व विविध पर्यावरणाचे प्रश्न लक्षात घेता सर्वानी पर्यावरण साक्षर होणे गरजेचे आहे . पर्यावरण साक्षरतेतून विविध प्रश्न सुटु शकतील दरवर्षी तापमानात वाढ होत असून जैव विविधतेचे प्रमाण ही कमी होत आहे.

सध्या कचरा ही मोठी समस्या बनली आहे . पृथ्वी माणसाची गरज भागवू शकते . परंतु कोण्या एका व्यक्तीची हाव भागवू शकत नाही.
वाढत्या प्लॅस्टिकचा वापर बाबत घोरपडे यांनी चिंता व्यक्त केली .राज्यात नॅचरल हिस्टरी म्युझियम होण्याची आवश्यकता ही घोरपडे यांनी व्यक्त केली .

यावेळी प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले . स्वागत प्रकाश बाफना यांनी केले .सूत्रसंचालन व आभार प्रा . सतीश धुमाळ यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button