Uncategorizedक्रीडाविशेष

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले त्याच वेळी मी जिंकले –

अर्जून पुरस्कार प्राप्त धावपटु सावरपाडा एक्सप्रेस कविता राउत

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम  ) सन २०१६ ला ऑलिम्पिक  मध्ये अपयश आले असले तरी ॲलिम्पिक साठी पात्र ठरले तेव्हाच मी जिंकले होते असे शिवछत्रपती पुरस्कार व अर्जून पुरस्कार प्राप्त धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राउत  शिरुर येथे म्हणाल्या .

     येथील ज्ञानगंगा विश्व विद्यालय शिरुर येथे राउत यांच्या विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी  हिलिंग लिव्हिंगच्या  जानकी विश्वनाथन , ज्ञानगंगा विश्व विद्यालयाचे प्रा . डॉ . राजेराम घावटे  ,पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे ,संतोष साबळे , महेश तुंगारकर , संतोष सांबारे ,खेळाडू आरती दसगुडे ,तुषार पाचुंदकर , नवनाथ फरगडे , आदी उपस्थित होते .
विद्यार्थ्याशी प्रश्नोत्तराचा स्वरुपात संवाद साधतानाराउत म्हणाल्या की माझ्या आदर्श भारताच्या सुवर्णकन्या पी . टी उषा होत्या .मला उड्डण परी नावाच्या धडा शिकण्यास होता . त्याचा ही प्रभाव माझ्यावर पडला .  जीवनात यश अपयश असते त्यामुळे अपयशाचा विचार न करता  जो पर्यत ध्येय साध्य होत नाही तो पर्यत प्रयत्न करीत राहा .  विद्यार्थ्यानी अभ्यासा बरोबर खेळा कडेही  लक्ष द्यावे  . खेळात ही करियरची मोठी संधी आहे .
खेळात फिटनेस महत्वाचे आहे. पहाटे तीन पासून ३० ते ३५ कि . मीचा सराव ॲलिम्पिकचा वेळेस  मी दररोज करायचे असे सांगून राउत म्हणाल्या की ॲलिम्पिक मध्ये अपयश आले तरी त्यासाठी पात्र झाले तेव्हाच मी जिंकले होते .
यावेळी जानकी विश्वनाथ म्हणाल्या की प्रत्येक क्षणाचा उपयोग करा .जीवनाचा आनंद घ्या .
प्रास्ताविक डॉ . राजेराम घावटे यांनी केले . स्वागत अमृतेश्वरी घावटे , दीपक घावटे व प्रा . सुधीर शिंदे यांनी केले . मुख्याध्यापक संतोष येवले , सुनंदा लंघे , आदी यावेळी उपस्थित होते .
सूत्रसंचालन प्रा . जयश्री खणसे यांनी केले तर आभार डॉ . नितीन घावटे यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button