शिरुर दिनांक ( वार्ताहर )
विद्याधाम प्रशालेतील सेवानिवृत्त विठ्ठल बाबूराव पडवळ (वय -७४) यांचे निधन झाले .
त्याच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , एक विवाहित मुलगी , सून, जावई , नातवंडे असा परीवार आहे . विद्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती .
शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्यात ही ते सहभागी होत . विद्याधाम प्रशालेचा शिरुर शाखेसह विविध शाखेत त्यांनी काम केले .व्यवसायिक रोहन पडवळ यांचे ते वडिल होत .
अमरधाम स्मशानभूमीत पडवळ यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे , घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे , शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त प्रकाश बोरा , लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रविंद्र धनक , जनता दलाचे संजय वाखारे ,सेवानिवृत्त बॅक व्यवस्थापक रामदास आंधळे , ॲड .संजय वाखारे , जयवंत साळुंखे , प्रा . सतीश धुमाळ आदीनी यावेळी श्रध्दांजली वाहिली .