विशेषसांस्कृतिक

शिरुर मध्ये रंगली गझलांची मैफल . रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसाद

ओंकार संगीत विद्यालयाचे गायक गणेश मराठी यांनी केले होते शाम ए गझलचे आयोजन

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )
सुमधुर संगीताचा साथीत  व सुश्राव्य आवाजात सादर करण्यात आलेल्या गझलांनी शिरुरकर रसिकांची मने जिंकून घेतली .
ओंकार संगीत विद्यालयाचा वतीने येथील राजभोग सभागृहात शाम – ए -गझल या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते .

मैफलीच्या सुरवातीस शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , लोकजागृती संघटनेचे ॲड . ओमप्रकाश सतीजा , बांधकाम व्यवसायिक विलास गोसावी  माजी मुख्याध्यापक व्ही . डी . कुलकर्णी , मुख्याध्यापक विनायक म्हसवडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने  झाले .

oplus_131074
                 प्रसिध्द  गायक गणेश मराठे यांनी सादर केलेल्या ‘ चुपके चूपके रात दिन ‘   या गझल गायनाने या मैफलीची सुरुवात झाली .गोपाल भावसार यांनी ‘ झूकी झूकी सी नजर,’ ही गझल सादर केली . डॉ नूतन क्षीरसागर यांनी’ ये गझालसी निगाहे ‘  ही गझल सादर केली . कल चौदवी की रात में  ही गझल केतन गोसावी यांनी सादर केली त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . प्रेमात पडलेल्या प्रियकर प्रियसीच्या मनाची अवस्था गणेश मराठे व डॉ . नूतन क्षीरसागर यांनी सादर केलेल्या  ‘मेरे जैसे बन जाओगे ‘  गझलेतून उलगडून दाखविली . नितीन मामीडवार यांनी ‘ तुमको देखा तो यह ख्याल आया ‘  ही प्रसिध्द गझल सादर केली . मोनाली जाधव यांनी मुझे तुम नजर से गिरा तो ही गझल सादर केली .
गणेश मराठे यांनी ‘ कैसे सुकून पाऊ ‘
प्यार का पहला ख़त या गझल सादर केल्या  . डॉ . समीर ओंकार यांनी ‘ चांदी जैसा रंग है तेरा ही गझल सादर केली त्यास ही रसिकांनी दादा दिली. गोपाल भावसार यांनी सदर केलेल्या ‘ किसी नजर को आज भी इंतजार है ‘ या गझलेने ही रसिकांची वाहवा मिळवली .
.सलोना सा सजन है  ही गझल सुषमा झावरे यांनी सादर करीत सर्वांची मने  जिंकली .
  ,मेरे दिल में तू ही तू है ,तुम आओ तो सही ,रफता रफता , फिर छेडी बात , आप जिन के करिब होते हैं,कौन कहेता हैं ,रंजिश ही सही , या गझलांनी मैफलीत रंगत आणली . 
आज जाने की जिद या गझलेने या मैफलीचा समारोप झाला . गिरीष हारके यांनी या मैफलीचे बहारदार  निवेदन केले . यावेळी
तबल्याची साथ संगत सखाराम पुरी यांनी केली . आभार विलास गोसावी यांनी मानले .
 
   यावेळी प्रा .डॉ .क्रांती पैठणकर , सनदी लेखापाल विशाल झावरे  व्यवसायिक आशिष जावळे , डॉ .आनंद क्षीरसागर , डॉ . शिल्पा घोडे , माजी सभापती ॲड . प्रदीप बारवकर , ॲड . सीमा काशीकर ,प्रमोद काशीकर , माजी मुख्याध्यापक  अनिल तांबोळी आदी उपस्थित होते .
ओंकार संगीत विद्यालयाचा वतीनेएकादशी गणेशोत्सव , नवरात्र , आषाढी  , दिवाळी या निमित्ताने संगीत मैफलीचे आयोजन करण्यात येत असल्याचे गणेश मराठे यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button