Uncategorizedविशेष

कृत्रिम डोळा, अल्पदृष्टी उपचार, मायोपिया नियंत्रण, विशेष कॉन्टॅक्ट लेन्स यांसारख्या आधुनिक नेत्रउपचारांची संपूर्ण माहितीचे स्पेशालिटी आयकेअर ग्रुप, पुणे च्या नवीन संकेत स्थळाचे उदघाटन

डॉ . एकनाथ साळुंके यांची माहीती.

शिरुर ,दि . ( वार्ताहर )डोळे हे केवळ दृष्टीसाठीच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठीही महत्त्वाचे असतात. मात्र, काही लोकांना अपघात, आजार किंवा जन्मजात दोषामुळे डोळा गमवावा लागतो. अशा परिस्थितीत चेहऱ्याचे सौंदर्य बिघडून आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून स्पेशालिटी आयकेअर ग्रुप, पुणे येथे कस्टमाइज्ड कृत्रिम डोळ्यांचे (ऑक्युलर प्रोस्थेसिस) उच्च तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असल्याची माहिती डॉ . एकनाथ साळुंके यांनी दिली .ते म्हणाले गेल्या आठ वर्षांत, संस्थेने कृत्रिम डोळा निर्मिती आणि रोपण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर या सेवेला मोठी ओळख मिळाली आहे. डॉ. एकनाथ साळुंके यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने हजारो रुग्णांना नव्याने आत्मविश्वास मिळवून दिला आहे.

त्यांनी सांगितले की डिजिटल ऑक्युलर प्रोसेसचे फायदे  पुढील प्रमाणे आहेत . नैसर्गिक आणि वास्तविक स्वरूपाचा कृत्रिम डोळा
✔ स्वतःच्या चेहऱ्याशी समरूप असलेला कस्टमाइज्ड डिझाइन
✔ आत्मविश्वास वाढविण्यास मदत
✔ अत्याधुनिक रियल आय प्रोस्थेटिक टेक्नॉलॉजीचा वापर
✔ सर्व वयोगटांसाठी योग्य आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय हे तंत्रज्ञान फक्त सौंदर्यासाठीच नाही, तर मनोवैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. कृत्रिम डोळा बसवल्यानंतर रुग्णाचा आत्मविश्वास पूर्ववत होतो आणि त्याचा सामाजिक स्वीकारही वाढतो.कृत्रिम डोळ्यांविषयी समाजात अजूनही पुरेशी जागृती नाही. यासाठी स्पेशालिटी आयकेअर ग्रुप, पुणे ने उच्च दर्जाचे संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर कृत्रिम डोळा, अल्पदृष्टी उपचार, मायोपिया नियंत्रण, विशेष कॉन्टॅक्ट लेन्स यांसारख्या आधुनिक नेत्रउपचारांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ही वेबसाईट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने पद्मश्री डॉ. अण्णा हजारे यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी स्वतः डॉ. एकनाथ साळुंके यांच्याकडून या तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेतली आणि संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.”कृत्रिम डोळ्यांबद्दल समाजात अधिक जागरूकता निर्माण होणे गरजेचे असल्याचे ” पद्मश्री डॉ. अण्णा हजारे  यांनी सांगितल्याचे साळुंके यांनी सांगितले .कृत्रिम डोळ्यांशिवाय, स्पेशालिटी आयकेअर ग्रुप अनेक आधुनिक नेत्रउपचार उपलब्ध करून देत आहे, सिलिकॉन ऑर्बिटल प्रोस्थेसिस – कोरोना नंतर झालेल्या बुरशी संसर्गामुळे डोळा गमावलेल्या रुग्णांसाठी विशेष उपाय
दृष्टीयंत्रे (लो-व्हिजन एड्स) – ज्यांना नेहमीचा चष्मा, औषधे किंवा शस्त्रक्रिया उपयोगी पडत नाही अशा अल्पदृष्टी असणाऱ्या रुग्णांसाठी  स्पेशालिटी कॉन्टॅक्ट लेन्स – नेत्रपटलाचा (कॉर्नियाचा) कीरॅटोकोनस आजार असणाऱ्या रुग्णांसाठी विशेषतः विकसित केलेले लेन्स
मायोपिया कंट्रोल ट्रीटमेंट – मुलांमध्ये चष्म्याचा नंबर वाढू नये म्हणून विशेष उपाय
व्हिजन थेरपी – दोन्ही डोळ्यांचा समन्वय वाढवण्यासाठी आणि डोळ्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपयुक्त थेरपी ,पूर्वी अशा तंत्रज्ञानासाठी आणि उपचारांसाठी रुग्णांना दिल्ली, मुंबई, बंगळुरू अशा ठिकाणी जावे लागत होते. मात्र, स्पेशालिटी आयकेअर ग्रुप, पुणे यांनी ही सर्व सेवा शिवाजीनगर, पुणे येथे एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत

.या अभिनव उपचारपद्धतीमुळे, डोळ्यांचा गंभीर आजार किंवा निकामी झालेला डोळा असलेल्या रुग्णांना नव्याने आत्मविश्वास मिळत आहे. स्पेशालिटी आयकेअर ग्रुप ने आपल्या कार्याने पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृत्रिम डोळा रोपण केंद्र म्हणून ओळख मिळवून दिली असल्याचे डॉ . साळुंके यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button