Uncategorizedगुन्हेगारी
अज्ञात चोरट्याने ३ लाख ४५ हजार रु च्या सोने चांदीच्या दागिन्याची केली चोरी.
एस . टी . प्रवासा दरम्यान घटना
शिरूर दिनांक ( वार्ताहर )
एस . टी प्रवासात बसमधील सीटच्या खालील बॅग मधील सव्वाचार तोळ्याचे सोन्याचे दागिने , चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख ४५ हजार ५०० रु.चा ऐवज अज्ञात चोरट्यांने चोरुन नेला .

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा आत्माराम लोंढे वय ६० वर्ष, व्यवसाय ,घरकाम रा. वाडाकॉलनी, शिरुर ,ता.शिरुर जि. पुणे यांनी अज्ञात चोरटाचा विरोधात फिर्याद दिली आहे . दि. 26 फेबृवारी 2025 रोजी दुपारी साडेबारा ते पावणेचार च्या दरम्यान केडगाव चौफुला ते शिरुर प्रितमप्रकाश नगर, दरम्यान शिरुर-चौफुला एस टी बस नं एम .एच .40 वाय- 5814 मधील कंडक्टर शेजारी बसलेल्या शिटखाली ठेवलेल्या बॅगमधुन अज्ञात चोरट्याने चोरी करुन चोरून नेले आहे. 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके , नाकातील १ ग्रॅमच्ता दोन नथ , १८ ग्रॅम वजन्याच्या
3 हातातील 5 अंगठ्या , १३ ग्रॅम वजानाचे गळ्यातील हाफ गंठण ,चांदीचे पैजन, छल्ला, मासोळ्या व जोडवे , दहा हजार रु रोख रक्कमअसा 3,45,500 रु चा ऐवज चोरुन नेला .

यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवाल राउत करीत आहेत










