विशेष
उद्योगपती रसिकलाल माणिकचंद धारीवाल जयंती निमित्त शिरुर येथे १ मार्च रोजी महारक्तदान शिबीर
शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयात सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत होणार शिबीर
शिरुर दिनांक ( वार्ताहर )
प्रसिध्द उद्योगपती व माजी नगराध्यक्ष
स्व. रसिकलालजी धारीवाल
यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी महा रक्तदान शिबीराचे आयोजन शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे .
सकाळी ७ ते सायं. ६ वाजेपर्यंत हे शिबीर होणार असून मागील वर्षी महा रक्तदान शिबीरात १५०० आधिक जणांनी रक्तदान केले होते . स्वर्गिय रसिकलाल धारीवाल यांचे शहरातील सामाजिक , शैक्षणिक , राजकिय,व्यवसायिक क्षेत्रात मोठे योगदान आहे . महा रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिबीराचे आयोजक प्रकाशभाऊ धारीवाल मित्र मंडळ, शिरुर शहर व पंचक्रोशी यांनी केले आहे . उद्योगपती स्व. रसिकलाल धारीवाल जयंती निमित्त समाजामध्ये सायकलिंगचे महत्व वाढावे याकरिता ८६ सायकल देण्यात येणार आहे .
