विशेष

शिरुरच्या जीवन विकास मंदिर संस्थेच्या विद्यार्थ्यानी राबविली रामलिंग मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम

५० हून आधिक बॅगेत कचरा संकलन

oplus_131072
oplus_131074
oplus_131072
oplus_131074
oplus_131072
oplus_131074
oplus_131074
oplus_131074
oplus_131074
oplus_131074

शिरुर ( डेली न्यूज  पोस्ट )
महाशिवरात्रीला शिरुर येथील रामलिंग मंदिरात यात्रा असते . काल बैलगाड्या शर्यतीनंतर तीन दिवस चालेल्या या यात्रेची समाप्ती झाली . यात्रे दरम्यान या परिसरात निर्माण झालेल्या प्लॅस्टिकच्या व अन्य कचराचे संकलन जीवन विकास मंदिर संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यानी संकलन करीत या परिसरात स्वच्छता मोहिम राबवून हा परिसर चकाचक केला .
जीवन विकास मंदिर संस्थेचा शाळेतील
इयत्ता सातवी आठवी व नववीतील ५० हून आधिक विद्यार्थी विद्यार्थिनी आज सकाळी वाहना मधुन स्वच्छतेची असणारे साधने झाडू व कचरा संकलनासाठीच्या पिशव्या घेवून दाखल झाले . हाता झाडू घेवून त्यांनी परिसराची स्वच्छता केली व प्लॅस्टिक कचराचे संकलन केले .२५ किलोच्या ५० हून आधिक कचरा संकलन बॅग मध्ये हा कचरा गोळा करण्यात आला .
जीवन विकास मंदिर संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक रवींद्र धनक म्हणाले की विद्यार्थ्यामध्ये सामाजिक बांधिलकी व स्वच्छतेचे महत्व रुजविण्यासाठी शाळेच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली . आरोग्य चांगले राहण्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता महत्वाची आहे. यापुढे दरवर्षी रामलिंग यात्रे नंतर या परिसरात शाळेच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याचे धनक यांनी सांगितले .
रामलिंगच्या सरपंच शिल्पा गायकवाड यांनी विद्यार्थ्याच्या या स्वच्छता मोहिमेस भेट देवून विद्यार्थी करत असलेल्या या स्वच्छता मोहिमे बद्दल अभिनंदन केले . जीवन विकास मंदिर शाळेचे शिक्षक दिलिप शिंदे , अजय सोनवणे , अश्विनी मोरे व रेणूका जाधव आदी यावेळी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button