माजी मुख्याध्यापक विलासराव लोळगे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार
शैक्षणिक सह सामाजिक राजकिय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
शिरुर दिनांक – शिरुरच्या शैक्षणिक क्षेत्रात माजी मुख्याध्यापक विलासराव लोळगे यांचे मौल्याचे योगदान असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग सदस्य व माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण म्हणाले .
माजी मुख्याध्यापक विलास लोळगे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्याच्या व पत्नी वैशाली लोळगे यांच्या विशेष नागरी सन्मान करण्यात आला .
यावेळी मंचावर विलासराव लोळगे , वैशाली लोळगे यांच्यासह माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे , माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , माजी लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र लोळगे , माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक व्ही .डी. कुलकर्णी होते .
याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे म्हणाल्या की लोळगे परीवारात अनेक जणांनी ज्ञानदानाचे काम केले. लोळगे कुटुंबातील अनेक जण विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रसिध्द आहेत .विलासराव लोळगे यांनी शिरुर नगरपरिषदेत चांगले काम केल्याचे त्या म्हणाल्या .
जाकिरखान पठाण म्हणाले की शिरुर नगरपरिषदेच्या शाळा ब्रिटीश काळापासून कार्यरत आहेत .राज्य व केंद्र शासनातील अनेक आधिकारी हे जिल्हा परिषद व
नगरपरिषद शाळेतील आहेत .लोळगे यांनी विद्यार्थी घडविले . काम करत असताना मित्राचा मोठा गोतावळा जमविला. लोळगे कुटुंबाची शिक्षण क्षेत्रात अध्यापनाची मोठी परंपरा असल्याचे पठाण म्हणाले .
सत्काराला उत्तर देताना विलासराव लोळगे म्हणाले की शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले . शिक्षक म्हणून काम करताना केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . क्रीडा , विज्ञान , स्काउंड हे विशेष आवडीचे क्षेत्र होते .सेवानिवृतीनंतर ही शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करत असल्याचे लोळगे यांनी सांगितले .

माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा,माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल , लत्ता शिराळकर , रुपेश घाडगे , प्रतिभा औटी , शिल्पा बेंद्रे , नोटरी शिरीष लोळगे , 
आदीची मनोगते झाली .
यावेळी नगरपरिषदेचे माजी सभापती ॲड . सुभाष गायकवाड पंचायत समितीचे सेवानिवृत्त आधिकारी रामभाउ शेटे , मुख्याध्यापक संतोष चव्हाण , मुख्याध्यापक संजय वाघ ,स्टेट बॅकेचे सेवानिवृत्त आधिकारी नंदकुमार पिंजरकर , माजी मुख्याध्यापक नारायण निंबाळकर , माजी मुख्याध्यापिका गोदावरी गायकवाड , स्वामी समर्थ सेवा संस्थेचे गणेश घाडगे , नीलेश नवले , सी . ए . आशिष भोजने , अल्ताफ शिकलगार , आदी उपस्थित होते .
माजी नगरसेवक संजय खांडरे यांनी प्रास्ताविक केले .
स्वागत सचिन लोळगे व अभिजीत लोळगे यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अशोक मानमोडे यांनी केले .