विशेषशैक्षणिक

व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरुरच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी पाहिला छावा चित्रपट

व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचा वतीने विद्यार्थ्याना मोफत चित्रपट दाखविण्यात आला .

 

शिरुर दिनांक ( वार्ताहर ) व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरुरच्या ३५० हून आधिक विद्यार्थी विद्यार्थिनीना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट ऑक्सीगोल्ड चित्रपटगृह येथे  दाखविण्यात आला .

चित्रपट पाहिल्या नंतर स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रम शौर्य व स्वराज्यासाठीचे बलिदान पाहून विद्यार्थी भारावून व गहिवरुन गेले .विद्यार्थ्याना छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम शौर्य व जीवनाची माहिती व्हावी म्हणून व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचा सर्व विद्यार्थ्याना हा चित्रपट स्कूलचा वतीने कर्तव्य भावनेतुन मोफत दाखविण्यात आला असल्याचे व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष विकास पोखरणा यांनी सांगितले . वढू व तुळापूर या ठिकाणीही विद्यार्थ्याना घेवून जाण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला .

व्हीजन इंटरनॅशनल स्कूल शिरुरचे विद्यार्थी गारद सादर करताना

चित्रपट सुरु होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यानी गारद सादर करीत छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोष केला . यावेळी व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या पदाधिकारी  पूजा पोखरणा , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , माजी नगरसेवक संदिप गायकवाड , शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल काळे , भाजपाचे पदाधिकारी विजय नरके , नीलेश काळे ,स्कुलच्या मुख्यध्यापिका पसक्कीन कासी , शिक्षीका शितल जाधव  आदी यावेळी उपस्थित होते .
शूरत्व ,धाडस देशभक्ती,स्वराज्य भक्ती ,निडरपणा,निर्भीडपणा,निष्ठा, धैर्य,बाणेदारपणा या सर्वांचे दर्शन छावा चित्रपटातून विद्यार्थ्याना झाले असे सांगून व्हिजन इंटरनॅशनल स्कूल ने हा चित्रपट सर्व विद्यार्थ्याना मोफत दाखविल्याबद्दल पालक प्रा . अलका बेलोटे यांनी स्कूलचे विश्वस्त व शिक्षक वर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त केली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button