Uncategorizedक्राईम

अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेवून त्यास पोलीस तपास पथकाने घेतले ताब्यात

पोलीसांनी शिरुर व राहाता तालुक्यातील ५०सी सी टीव्ही फुटेजची तपासणी करुन घेतला वाहनचालक व वाहनाचा शोध

शिरुर दिनांक ( वार्ताहर ) आंबळे , ता शिरुर येथे मोटार सायकल व अज्ञात वाहनाचा अपघातात मोटारसायकल वरील युवक मृत्युमुखी पडला होता .
याप्रकरणी अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेवून पोलीस तपास पथकाने घेवून अपघातातील महेंद्रा बुलेरो जप्त केली आहे .
याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ फेबृवारी २०२५ रोजी सांयकाळी चारच्या सुमारास आंबळे (देशमुखवस्ती) ता. शिरूर, जि. पुणे येथे केसरी हॉटेल पासुन शेखर बाबासाहेब धायगुडे वय २३ वर्ष रा. धायगुडेवस्ती, कुसमोड ता. माळशीरस, जि. सोलापुर, हा त्याचे मोटारसायकाल क्र एम. एच. ४५ ऐ. वाय ०७०९ यावरून शिरूर बाजुकडे जात असताना त्यास अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन बेदरकारपुणे हयगयीने, अविचारने, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून मोटारसायकलला धडक दिली . त्यात धायगुडे हे किरकोळ व गंभीर दुखापत होवुन मुत्युमुखी पडले होते . वाहनचालक तेथुन पळून गेला होता.

या बाबत प्रविण बाबासाहेब धायगुडे, वय २६ वर्ष, रा. सुतारवाडी पाषाण पुणे. मुळ रा. धायगुडेवस्ती, कुसमोड ता. माळशिरस, जि. सोलापुर, यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर १०९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५, (अ), (ब), मो वा कायदा कलम १८४,१३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता व तपास पोलीस हवालदार नारायण जाधव हे करीत होते . पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सदर गुन्हयाची गंभीरता व संवेदनशिलता लक्षात घेवुन अपघातामधील अज्ञात वाहन व चालकाचा शोध घेणेबाबत तपास पथकाला आदेश दिले होते . तपास पथकामधील पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांनी शिरूर तालुका तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामधील  राहता तालुक्यातील सुमारे ५० पेक्षा जास्त सी. सी. टी. व्ही फुटेज यांची तपासणी करून अपघातामधील अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेतला . हा अपघात चालक नितीन किसनराव गडाख रा. धनगरगल्ली ,नेवासा. ता नेवासा जि. अहिल्यानगर याने केला असुन अपघातामधील महींद्रा बलेरो पिकअप के .एम .एच .१७ सी .व्ही
९३८३ ही गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आली आहे.
हा तपास पोलीस अधिक्षक पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पो हवा नाथसाहेब जगताप, नारायण जाधव, पोलीस अमंलदार अजय पाटील, रविंद्र आव्हाड सचिन भोई, नितेश थोरात, विजय शिंदे,, निरज पिसाळ, निखील रावडे यांचे पोलीस पथकाने केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button