Uncategorizedमहाराष्ट्र

मतदार यादी विशेष पुनर्नरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) संदर्भात जनजागृती व आढावा बैठक २० मार्च रोजी शिरूर नगरपरिषद कार्यालयात

  1. शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी विशेष पुनर्नरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) संदर्भात जनजागृती व आढावा बैठक २० मार्च रोजी शिरूर नगरपरिषद कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या या बैठकीस संबंधित सर्व घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    मतदार यादी अद्ययावत ठेवणे, नवीन मतदारांची नोंदणी, नावे दुरुस्ती व विलोपन याबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

    बैठकीत मतदार यादी २००२ च्या अनुषंगाने नावांची खात्री व वंशावळ पडताळणी, एसआयआर कार्यक्रमाची सविस्तर माहिती, बीएलओ व सुपरवायझर यांच्या जबाबदाऱ्या, तसेच मतदार नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे.

    ही बैठक शिरूर नगरपरिषद कार्यालयातील आदरणीय रसिकभाऊ धारीवाल सभागृहात होणार असून, संबंधितांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button