निधन वृत्तराष्ट्रीय
जनता दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कांतीलाल बाफना यांचे निधन
अंत्ययात्रा - शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता यशवंत कॉलनी येथील राहत्या घरापासून निघेल


समाजवादी विचारसरणीचे बाफना यांनी जनता दलात पदावर काम केले होते. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग हे बाफना यांच्या शिरूर येथील घरी येऊन गेले होते. श्रमकरी, कष्टकरी यांचे संघटन करून विविध प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे ते निकटवर्ती म्हणून ओळखले जात.
रयत शिक्षण संस्था शिरूर येथील शाळेचे स्थानिक सल्लागार समितीचे ते माजी उपाध्यक्ष होत.
