Uncategorized

पंजाब मधील पुरग्रस्त बांधवाना शिरूर मधील सकल जैन समाजच्या वतीने मदतीचा हात

oplus_131074

शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम)समस्त सकल जैन शिरूर यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पंजाबातील पूरग्रस्त भागातील लोकांसाठी शिरूर शहरातून अन्न धान्य सह विविध स्वरूपाची मदत पंजाब कडे रवाना करण्यात आली.

  1. गौतममुनीजी (बरसादाता )व चैतन्यमुनीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत  १ हजार किलो आटा, ५०० किलो तांदूळ, ५५ बॉक्स बिस्कीट, ७० हजार रु औषध, नवीन कापडे, १०० किलो फरसाण,यांनी भरलेला टेम्पो पंजाब कडे रवाना करण्यात आला. तसेच जुन्नर जैन महासंघ महिला मंडळ यांनी रोख ५१ हजार रुपये दिले.
अहिल्यानगर मधील गोविंदपुरा तील  गुरुद्वारा येथे ही मदत  जमा करण्यात येणार असून तेथून ती पंजाब मध्ये पाठविण्यात येणार आहे.
सचिन चोरडिया, महेंद्र बोरा प्रितेश फुलडाळे, प्रशांत गादिया, प्रशांत बोरा, मनिष कोठारी, यांनी ही मदत गोळा करण्याकामी पुढाकार घेतला.
यावेळी  संघपती मुन्ना चोरडिया,माजी नगरसेवक संतोष भंडारी, प्रकाश पारस, महावीर कोठारी, सुभाष जैन, राहुल बोथरा, नीलेश पिपाडा,आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button