शिरूर दिनांक (वार्ताहर ): संशोधन हे समाजोपयोगी व सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणारे असावे असे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम म्हणाले.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात महाविद्यालयीन स्तरावरील ‘आविष्कार’ संशोधन प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ११२ विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले.
कार्यक्रमाचे उदघाट्न शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की “संशोधन हे समाजोपयोगी व सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणारे असावे” तसेच संशोधनाचा प्रवास महाविद्यालयीन स्तरापासून पीएच.डी. पर्यंत व्हावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘आविष्कार’ स्पर्धेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे उलगडून सांगितली.
आविष्कार स्पर्धा ही एक संशोधन आणि नवोपक्रम स्पर्धा आहे, जी विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते.
या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना विविध विषयावर आंतर शाखीय संशोधन करण्याची एक संधी असून त्यामुळे अनेक संशोधक व शास्त्रज्ञ यांच्याशी संवाद साधने शक्य होते.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. हरिदास जाधव,एआरसीचे समन्वयक डॉ. सुनील भोईटे व प्राध्यापक व सहभागी विद्यार्थी उपस्थिती होते.
