Uncategorizedविशेष

महिला दिनानिमित्त पोलीस अमंलदार महिलांचा सन्मान व बाईक रॅली , वकिल महिलांनी साधला वृध्दाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद तर मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मानवात्सल्य सिंधू फाउंडेशन च्या वतीने शिरूर नगरपालिकेच्या प्रेरणा उद्यान येथील महिलांना सेफ्टी शूज चे वाटप

शिरुर मध्ये महिला दिन उत्सहात साजरा

वात्सल्य सिंधू संस्थेच्या वतीने नगरपालिकेचा प्रेरणा उद्यानातील महिलांना सेफ्टी शुजचे वटप करण्यात आले .

शिरुर :-जागतिक महिला दिनानिमित्त  शिरुर पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस यांनी शिरुर शहरातून बाईक रॅली काढून महिला सबलीकरणाचा संदेश दिला .

महिला दिनानिमित्त गोकूळ वृध्दाश्रमात ज्येष्ठ नागरिकांशी साधला महिला वकिलांनी संवाद                                               जागतिक महिला दिनानिमित्त  पोलीस  निरीक्षक संदेश केंजळे  यांनी पोलीस स्टेशन मधील सर्व महिला पोलिस अंमलदार यांना फेटे बांधून साडी भेट दिली .  सर्व महिला पोलिस अंमलदार यांनी शिरूर शहरांमधून बाईक रॅली काढली व  महिला सबलीकरनाचा संदेश देण्यात आला.

 

जागतिक महिला दिनानिमित्त शिरूरच्या महिला वकील भगिनींनी ,गोकुळ वृद्धाश्रमातील ज्येष्ठ  नागरिकांसोबत गप्पागोष्टी करत,त्यांच्या भावना,विचार समजून घेत,त्यांचे काही क्षण सुखाचे,आनंदाचे करण्याचा प्रयत्न केला.यावेळी शिरूर वकील संघाच्या महिला उपाध्यक्षा ॲड.वर्षाराणी वडगावकर, ॲड्. सीमा काशीकर, ॲड . सुवर्णा  वाघमारे,ॲड. सरिता खेडकर,ॲड.  अमृता वा खारे,ॲड्.प्रणिता जोशी, ॲड्.प्रतिभा पठारे, ॲड्.शुभांगी गायकवाड,ॲड्. पल्लवी कांकरवाल,ॲड्.सोनाली अच्छा,इत्यादी महिला वकील भगिनी उपस्थित होत्या. मातोश्री कला क्रिडा व सांस्कृतिक  प्रतिष्ठानच्या वतीने शिरुर शहरातील राजमाता अकॅडमीच्या प्रा. अलका बेलोटे (बोरुडे ),ॲक्टिव्ह सोशल ग्रुपच्या प्रमुख  कामिनी प्रकाश बाफना आयुर्वेदाचार्य डॉ. स्मिता बिपिन बोरा  ,उद्योजिका व  माजी सरपंच वर्षा   फक्कड काळे  यांना सन्मानचिन्ह व शाल देवून सन्मानित करण्यात आले .यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर म्हणाले  की व्यक्ती व समाजाच्या  जडघडणीत महिलांचा वाटा मोठा असुन प्रत्येक क्षेत्रात महिलांची  आघाडी आहे .  प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्व व यशाचा ठसा महिलांनी उमटविलेल्या असल्याचे ते म्हणाले . यावेळी आदिती आढाव , डॉ . बिपीन बोरा , शैलेश जाधव , सतिश केदारी आदी उपस्थित होते .उद्योजिका व माजी सरपंच वर्षा फक्कड काळे ( पोटावळे ) यांच्या सन्मान करताना
 महिला दिनाचे औचित्य साधून शिरूर येथील वात्सल्य सिंधू फाउंडेशन च्या वतीने शिरूर नगरपालिकेच्या प्रेरणा उद्यान म्हणजेच कचरा डेपो येथील महिलांना सेफ्टी शूज चे वाटप करण्यात आले.
 कार्यक्रमास वात्सल्य सिंधू फाउंडेशन प्राची वाखारे सुनीता लंघे उषा वाखारे स्वाती थोरात मनीषा तरटे वृषाली मुसळे प्रणाली मुसळे आदी महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमात स्वागत सतीश व्यवहारे यांनी केले तर प्रास्ताविक नगरपालिकेच्या वतीने प्राची वाखारे यांनी केले तर आभार चंद्रकांत अहिरे यांनी मानले. यावेळी वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या मनीषा तरटे यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. तर फाउंडेशन च्या वतीने कचरा डेपो वरील महिलांना सेफ्टी शूज चे वाटप करण्यात आले. आणि महिला दिनानिमित्त गुलाब पुष्प देऊन सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला.
नगरपालिकेच्या कचरा डेपोवरील कामगार उषा गायकवाड केशरबाई पाटोळे कुसुम लोखंडे सुलोचना लोखंडे आशा घाडगे ममता सय्यद महिला उपस्थित होत्या. सेफ्टी शूज मिळाल्यानंतर महिलांना खूपच आनंद झाला. सदर कार्यक्रम प्रेरणा उद्यानातील सुक्या कचऱ्याच्या शेडमध्ये घेण्यात आला. नगरपालिकेच्या वतीने प्राची वाखारे उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button