Uncategorizedआरोग्य

गोडावून मधील ७ लाख ३५ हजार रुपये किमंतीचा साखरेचा ३९२ पोत्यांची चोरी

शिरुर( डेली न्यूज पोस्ट टीम -२४ )
रांजणगाव एमआयडीसीतील गोडावुन मधील रचलेली पोती ढासळुन बाजुचे भिंतीवर पडुन भिंत पडुन पोती बाहेर रोडवर गेल्याने रोडवरुन येणारे जाणारे अज्ञात लोकांनी 50 किलो वजनाची सात लाख ३५ हजार रुपये किमंतीची एकूण 392 साखरेची पोती अज्ञात लोकांनी चोरुन नेली आहेत .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार अक्षय कोंडीराम कटके वय. 24 वर्ष व्यवसाय नोकरी रा. इंदीरा चौंक निलंगा ता. निलंगा जि. लातुर यांनी
अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे .
दि. 10 फेबृवारी 2025 रोजी रात्री साडेदहा ते दि. ११ फेबृवारी २०२५ रोजी रात्री दीड चे दरम्यान रांजणगाव एम आय डी सी मधील पि.व्ही. सन्स कंपनी जवळील अग्रवाल यांचे साई इंदुसप्रो प्लैटीनम नावाचे गोडावुन येथे हा प्रकार घडला असून . 18 मार्च २०२५ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला .
रांजणगाव एम आय डी सी मधील पिव्ही सन्स कंपनी जवळील अग्रवाल यांचे साई इंदुसप्रो प्लैटीनम नावाचे गोडावुन येथे फिर्यादी अक्षय कटके यांच्या कंपनीचे नॅशनल बल्क हँडलींग कार्पोरेशन प्रा.ली. कंपनीचे ताब्यात असणारे गोडावुन मधील रचलेली पोती अचानक ढासळुन बाजुचे भिंतीवर पडली . त्यात भिंत पडुन पोती बाहेर रोडवर गेल्याने रोडने येणारे जाणारे अज्ञात लोकानी त्या ठिकाणावरून 50
किलो वजनाची एकुन 392 साखरेची पोती ज्याची किमंत 7,35,000 आहे ती रोडने येणा-या जाणा-या अज्ञात लोकांनी चोरून नेली .
याबाबत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिंदे तपास करत आहेत .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button