सोशल मिडिया वरुन आक्षेपार्ह पोस्ट व मेसेज करण्यारा विरोधात पोलीस कारवाई करणार : पोलीस निरीक्षक संदेश केंजळे
शिरुर दिनांक ( वार्ताहर) सोशल मिडीयाचा गैरवापर करून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशी पोस्ट व मेसेज करुन सोशल मिडीयावर व्हायरल करण्यांवर पोलिसांकडून प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करेल असा इशारा पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिला आहे .
केंजळे म्हणाले की सोशल मिडीयावर उदा. व्हाट्सॲप , फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, इ. वरुन आक्षेपार्ह टिपण्णी करु नये, राजकिय व धार्मिक पोस्ट करण्याचे टाळावे, ज्यामुळे समाजामध्ये दोन गटांमध्ये वाद निर्माण होणार नाही व जातीय सलोखा आबाधित राहण्यास मदत होईल याची काळजी घेऊन पोस्ट करावी. सोशल मिडीयाद्वारे वैयक्तिक व वादग्रस्त पोस्ट करु नये. अथवा पुढे फॉरवर्ड करु नये, आक्षेपार्य पोस्ट आढळून आल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. कोणतीही पोस्ट करताना त्याची सत्यता किती आहे ते पडताळूनच पोस्ट करावी,
व्हाट्सॲप व फेसबुक, इंस्टाग्रामवर राजकिय नेते व तसेच राजकिय पक्षांबाबत विनाकारण वादग्रस्त पोस्ट करुन आपल्या गावामधील सामाजिक सलोख्यास बाधा निर्माण होईल असे कोणतेही गैरकृत्य करु नये. सोशल मिडीयाचा गैरवापर करुन व इतर प्रतिष्ठीत व्यक्तिंचे नावाने फेक अकाऊंट ओपन करुन विनाकारण त्यावरुन अश्लील मॅसेजेस व पोस्ट करु नये.असे आवाहन केंजळे यांनी केले .
सोशल मिडीयाचा गैरवापर करून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशी पोस्ट व मॅसेज करुन सोशल मिडीयावर व्हायरल करण्यारावर शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा ही केंजळे यांनी दिला आहे .