Uncategorized
नशामुक्त अभियानाचा लढाईत नागरिकांनी सैनिक म्हणून सहभागी व्हावे .
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे आवाहन


रांजणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नशामुक्ति अभियान आयोजित करण्यात आले होते . या अभियान अंतर्गत पोलीस पाटील , शाळांचे मुख्याध्यापक , शालेय व्यवस्थापन समिती सदस्य , तंटामुक्ती समिती अध्यक्ष , विविध गावचे सरपंच शिक्षक यावेळी उपस्थित होते.
वाघमोडे म्हणाले की
नशामुक्त अभियानात लोकसहभाग महत्वाचा आहे . अमंली पदार्थाचा शरीरावर परिणाम होतो , व्यसनाधिनता वाढते . अंमली पदार्थामुळे अर्थव्यवस्था व युवक पोखरले जात आहे .
युवक व्यसनाचा आहारी गेल्यावर संबधिताचा रोजगार ,व्यवसाय व कुटुंबावर परिणाम होत असतो .

नशामुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प सर्वानी मिळून करावा असे ही ते म्हणाले .
अपेक्षांचे ओझे व त्यातुन अपेक्षा भंग झाल्यास येणारे नैराश्य ,कुतूहुल , संगत यातून व्यसनाकडे युवक जातात. अफू गांजा ,भांग , ब्राउन शुगर ,एम. डी. चरस , एल . एस . डी या सारखे अंमली पदार्थ आहेत . आपल्या परिसरात असे पदार्थ अथवा त्याचे सेवन करणारे आढळल्यास पोलीस स्टेशनकडे संपर्क करावा . एखाद्या टपरी वर विशिष्ट वेळी मोठी गर्दी होत असतील तर त्याची ही माहिती द्यावी . अंमली पदार्थ व्यसन करताना कोणी आढळले . शेतात कोणी गांजा लावलेल्या असेल तर त्याची ही माहिती पोलीसांना कळवावी असे आवाहन वाघमोडे यांनी केले .

युवा पिढी व्यसना पासून आपण वाचविली पाहिजे . प्रत्येकाने नशामुक्त अभियानात सैनिक म्हणून काम करावे. . व्यसनाच्या या विळख्यात आपला मित्र, कुटुंबातील सदस्य कोणीही सापडू शकतो .व्यसनाधिन लोकांना व्यसनापासून बाहेर काढून त्यांना जीवदान द्यावे .व्यसानाधिन व्यक्तीना आधार देत त्यांच्यावर उपचार करुन त्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे .
आपली मानव संसाधन चांगली राहण्यासाठी ती नशामुक्त असली पाहीजे .व्यसानाधिन व्यक्तीना आधार देत त्यांच्यावर उपचार करुन त्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे .शाळा महविद्यालय यांची नशामुक्त अभियानातील सहभाग कसा असावा यावर ही वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले .
आपली मानव संसाधन चांगली राहण्यासाठी ती नशामुक्त असली पाहीजे .व्यसानाधिन व्यक्तीना आधार देत त्यांच्यावर उपचार करुन त्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे .शाळा महविद्यालय यांची नशामुक्त अभियानातील सहभाग कसा असावा यावर ही वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले .