क्राईम

शिरुरच्या अपहरण झालेल्या १० वर्षाच्या बालिकेची सुटका

तीन आरोपी ताब्यात

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )
१० वर्षाच्या अपहरण झालेल्या बालिकेची सुटका करत पोलीसांनी ३ आरोपीना ताब्यात घेतले आहे. .याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ मार्च २०२५ रोजी सकाळी आठ   ते  दुपारी १ च्या दरम्यान शिरुर शहरातील  जोशीवाडी येथील राहत्या घरासमोरून १० वर्षीय  अल्पवयीन बालिकेस अमिष दाखवून  फूस लावून  पळवून  नेलेबाबत  १८२/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला  होता .
याचा तपास  पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत होते . या गुन्हयाची गंभीरता  व संवेदनशीलता लक्षात घेता पोलीस निरीक्षक संदेश केंजळे  यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनाअ गुन्हयातील अपहरित झालेल्या बालीकेचा व अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले .त्यानुसार  पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड यांनी अपहरण झालेली बालिका व अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरीता शिरूर शहरामधील सुमारे १०० पेक्षा अधिक सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. तपास करीत असताना गुन्हा घडले ठिकाणापासुन सी सी टी व्ही फुटेज तपासून तांत्रिक  विश्लेषन  केले असता अपहरण झालेल्या बालिकेच्या  पालकांना कोणीतीही पुर्वकल्पना न देता १) लताबाई बसीर काळे २) आकाश बसीर काळे ३) सुप्रिया उर्फ रॅम्बो आकाश काळे, सर्व  रा .सोने सांगवी, ता. शिरूर जि .पुणे हे मोटारसायकल वर आले व त्यांनी या बालिकेचे अपहरण करुन  घेवुन गेलेबाबत प्राथमिक  तपासामध्ये निष्पन्न झाले त्यावरून १) लताबाई बसीर काळे २) आकाश बसीर काळे ३) सुप्रिया उर्फ रॅम्बो आकाश काळे यांना ताब्यात घेतले असता त्यांनी बालिकेचे  अपहरण  करून तीला  बेलापुर मुंबई येथे नातेवाईकांकडे ठेवले होते. नातेवाईकांकडे ठेवताना  ही मुलगी आमची असुन आम्ही उपचारासाठी  दवाखान्यामध्ये जात आहोत आम्ही परत आल्यावर तीला घेवुन जातो असे खोटे सांगितले होते .
 पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे, यांनी  पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण  पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, महिला पोलीस अंमलदार गीता सुळे यांचे पथक तयार केले . या  पथकाने बेलापुर, मुंबई येथे जावून अपहरण झालेल्या  बालिकेस शिरुरला घेवून आले व या बालिकेस  नातेवाईकांकडे सूपूर्त केले .
हा तपास  पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक  रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक  शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथ जगताप, महिला पोलीस अंमलदार गीता सुळे, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, रविंद्र आव्हाड, सचिन भोई, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button