राष्ट्रीय

शासकिय जागेच्या सिमेंटच्या कंपाऊंड वॉलची तोडफोड केलेबाबत व कचरा डेपो येथील कचरास आग लावल्याप्रकरणी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल

äशिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शिरुर नगरपरिषदेच्या हद्दीतील शासकीय जागेला संरक्षित करण्यासाठी करण्यात आलेल्या सिमेंटच्या कंपाऊंड वॉलची तोडफोड केलेबाबत वकचरा डेपो येथील कचरा पेटविल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे .
शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो) येथील सिमेंटचे कंपाऊंड वॉल दि.२२ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री अज्ञात इसमाने तोडफोड केल्याचे सदर ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये निदर्शनास आले असून त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुध्द शासकिय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच कचरा डेपो येथील कचरा पेटविल्याप्रकरणी सुध्दा अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिरुर नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीतील स्वमालकीच्या व शासकीय जागेस चहूबाजूने सिमेंटच्या कंपाऊंड वॉल लावून संरक्षित केलेल्या आहेत. संरक्षित केलेल्या जागांचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्र (STP), पाबळ फाटा जवळ, (३) शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केटयार्ड) समोर, स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो), सोनार आळी येथील हनुमान मंदिर समोर या जागांना कंपाऊंड
करण्यात आलेले आहे .
नगरपरिषदेने सिमेंटच्या वॉलने संरक्षित केलेल्या जागा त्या जागेचे कंपाऊंड वॉल तोडल्याचे, वॉलवर अनधिकृतपणे रंगरंगोटी अथवा जाहिरातबाजी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर मालमत्ता विदृपीकरण कायदा १९९५ अंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा न्यायसंहिता अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही पालिकेचा वतीने देण्यात आला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button