Uncategorized

प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

 

प्राचार्य बाहेती यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 ) कस्तुरी शिक्षण संस्थेत आयोजित इंडो ब्राझिलियन कॉन्फरन्स मध्ये श्री. छत्रपती संभाजी शिक्षण संस्था शिरूर येथील सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती यांना फार्मसी शिक्षण क्षेत्रातील कामगिरी साठी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार माजी कुलगुरु व कस्तुरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ .पंडितराव पलांडे , उपाध्यक्ष डॉ .जयश्री पलांडे व मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ .पी .डी .चौधरी व कस्तुरी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ. मृणाल शिरसाठ यांच्या हस्ते देण्यात आला.याप्रसंगी डॉ. स्वरूप लाहोटी डॉ .गर्ग व डॉ. पांडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्रातील सुमारे ४० फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
तसेच डी. फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ.अमोल शहा यांना फार्मसी शिक्षण क्षेत्रातील विशेष कामगिरी साठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. द्वारकादास बाहेती हे १९९५ पासून येथील सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहेत. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी देश विदेशात फार्मसी शिक्षण , संशोधन निर्मिती तसेच व्यवस्थापन क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ . राजेंद्र थिटे ,सचिव धनंजय थिटे व .डॉ हर्षवर्धन थिटे व्यवस्थापक शिवाजीराव पडवळ यांनी व संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ . बाहेती यांचे अभिनंदन केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button