राष्ट्रीयविशेष

शिरुर मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन

शिरुर येथे राजमाता अहिल्यादेवी यांना अभिवादन करताना.

 

शिरुर  ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 ) :
शिरुर शहरात  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी  जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .
यावेळी अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
    पोलीस उपअधीक्षक  प्रशांत ढोले , माजी सभापती दादासाहेब कोळपे , माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे , राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष  शिवाजीराव कुऱ्हाडे, भाजपा तालुकाध्यक्ष  राहुल पाचर्णे , राष्ट्रवादी कॉग्रेसचे   तालुकाध्यक्ष  रवी काळे, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रविंद्र धनक , राहुल रणदिवे, , सरपंच कृष्ण गुलदगड , जगदीश पाचर्णे,  मनीषा जाधव ,  माजी नगरसेवक विनोद भालेराव,  माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ कदम, सुभाष कोळपे,,  राजू पुणेकर रावसाहेब गडदरे  , समता परिषदेचे किरण बनकर , शिवसेनेचे खुशाल बापू गाडे आदी उपस्थित होते .
                राजमाता अहिल्यादेवी  होळकर यांनी  लोककल्याणकारी कारभार केला . राजमाता  अहिल्यादेवींचे विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असून त्याच्या विचाराच्या अभ्यास करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले  .
   त्रिशताब्दी  जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम  घेण्यात येणार आहे. यावेळी सूत्र संचालन निलेश अवचिते यांनी केले आभार शिवाजी कु-हाडे  यांनी मानले .
राजमाता अहिल्यादेवी यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button