शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
जागतिक पर्यावरण दिनानिमित आरथ्रीएस सिक्युरिटी कंपनी ने वाघोली येथे जोगेश्वरी टेकडी वरती वृक्षारोपण करण्यात आले .
पर्यावरणाचे सध्याचे बिघडलेले गणित यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून व निसर्ग आपल्याला खूप काही देतो त्यांना वाचवण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी कंपनीचे संचालक रवींद्र आढाव.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून होप्स फाउंडेशनचे दत्तात्रय खालीपे , ब्रिलियंट कंपनीचे संचालक संदिप साकोरे , पोलिस पाटील तुषार पाचुंदकर .अजित वाघमारे, सुखदेव पाखरे आदी उपस्थित होते .
यावेळी रवींद्र आढाव यांनी सांगितले की जे वृक्ष लागवड केली आहे त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन त्यांची काळजी घेण्यात येईल . तसेच सामाजिक उपक्रम कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येईल . . पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी रायगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहेत .
