Uncategorized
रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -२४}न्हावरा ग्रामस्थांनी घोडगंगा साखर कारखान्याकडे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय करिता मागितलेली 10 एकर जागा त्यांना देण्यात येईल अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी केली.

न्हावरा.तालुका शिरूर येथील घोडगंगा सहकारी साखर कारखाना मागील तीन वर्षापासून बंद आहे.या पार्श्वभूमीवर कारखान्याची सर्वसाधारण सभा आज झाली. सभेबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता होती.
कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे (कात्रज )अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे, भाजपचे नेते भगवानराव शेळके यांच्यासह आजी-माजी संचालक यावेळी उपस्थित होते.
यावेळी सभासद व माजी संचालक यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना ऋषीराज पवार यांनी सांगितले की कारखाना सुरू होण्याकरता अनेक नेत्यांशी मीटिंग केल्या आहेत.
यापुढे ही कुठल्याही नेत्याकडे जाऊन चर्चेची तयारी आहे. त्याचबरोबर न्हावरा ग्रामस्थांनी घोडगंगा साखर कारखान्याकडे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय करिता मागितलेली 10 एकर जागा त्यांना देण्यात येईल.
कारखान्याला मदती संदर्भातला
प्रस्ताव देण्याकरिता कारखान्याचे मार्च अखेरील बॅलन्स शीट आवश्यक असल्याने प्रस्ताव त्यानंतर दिला.कारखाना चालू झाल्यावर सभासद शेअर्स विक्री
करू असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान माजी संचालक सुधीर फराटे म्हणाले की यंदाचा कारखान्याचा सिझन चालू झाला नाही तर अध्यक्ष राजीनामा देणार का. तीन वर्षात नव्याने कारखान्याचे सभासद काय केले नाहीत. किती मयत सभासदांची वारस नोंद करण्यात आली असा सवाल त्यांनी केला.
आमदार माऊली कटके यांचा कारखान्याच्या अहवालात फोटो का टाकला नाही असे ही त्यांनी विचारले.
माजी संचालक सुरेश पलांडे ही म्हणाले की संस्था चालविता येत नसेल तर राजीनामा द्या. यंदाचा ऊस गाळपासाठी काय नियोजन केले आहे.कारखान्याची शेअर्स विक्री करा. तीन वर्ष कारखाना बंद का आहे.
कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक दादा पाटील फराटे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कारखाना सुरू करण्यासंदर्भात शब्द दिला आहे.सर्व
संचालकांनी कारखान्या सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
कॉग्रेस आयचे नेते आबासाहेब गव्हाणे म्हणाले की तीन वर्ष सभासदांची दिशाभूल करण्यात येत आहे.
महेश ढमढेरे यांनी विविध प्रश्ननांची सरबत्ती यावेळी केली. घोडगंगा यंदा सुरु होण्यासाठी काय नियोजन केले आहे.कामगाराचे देणी देण्यासाठी काय नियोजन आहे.
कारखान्यावर कोण कोणत्या बँकेचे कर्ज आहेत याचे विस्तृत माहिती द्यावी.न्हावरा ग्रामस्थांच्या वतीने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाकरता दहा एकर जागा कारखान्याने द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
कारखान्या सुरु करायचा असेल तर मशीनरी दुरुस्ती केली आहे का असे विविध प्रश्न विचारले.
श्रीनिवास घाडगे, काकासाहेब खळ दकर बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, किसन बिडगर,यांनीही विविध सूचना यावेळी केल्या.