राजकीयराष्ट्रीय

शिरुर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

शिरुर ग्रामीण ,सणसवडी , मांडवगण फराटा , रांजणगाव गणपती , मलठण ग्रामपंचायत सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर्डोबाचीवाडी , न्हावरे , शिक्रापूर सर्वसाधारण महिला प्रवर्ग करीता

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )
शिरुर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीचा सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली . सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ३० , सर्वसाधारण साठी -२९  ओबीसी सर्वसाधारण १३ , ओबीसी महिला -१३ , अनुसुचित जाती सर्वसाधारण ४ व महिला ४ , अनुसुचित जमाती सर्वसाधारण १ व अनुसुचित जमाती महिला -२ असे ग्रामपांचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण होते .
सोडतीमुळे काहीचा अपेक्षा सरपंचपदाच्या उंचावल्या गेल्या तर काहीच्या अपेक्षा भंगल्या. त्यामुळे ‘कही खुशी ,कही गम ‘अशी अवस्था गावकारभारांची झाली होती. लोकशाही व्यवस्थेत ग्रामपंचायती महत्वाचा असून गावकारभारी सरपंचपदाचा माध्यमातून कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष असल्याने आजच्या आरक्षण सोडतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते .
शिरुर तहसिल कार्यालयाच्या इमारतीतील सभागृहात प्रांताधिकारी पूनम अहिरे ,तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत आरक्षपदाचा सोडत कार्यक्रम पार पडला . समीक्षा गिरमकर व वरद जाधव या विद्यार्थ्यांच्या हस्ते या सोडती काढण्यात आल्या .
राजकिय दृष्ट्या महत्वाची असणारी मुखई , जांबूत या ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण अनुसुचित जाती स्त्री प्रवर्गा करीता राखिव झाले . वडगाव रासाईचे अनुसुचित जमाती महिला करिता राखिव झाले आहे ओबीसी महिलां प्रवर्गाकरीता निमोणे व पिंपळे जगताप , व ओबीसी सर्वसाधारण करीता कवठे येमाई ग्रामपंचायत आरक्षित झाल्या आहेत .
सर्वसाधारण महिला साठी तर्डोबाचीवाडी , न्हावरा , शिक्रापूर ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षित झाले आहेत . शिरुर ग्रामीण ,टाकळी हाजी , रांजणगाव गणपती , मलठण , सणसवाडी ,मांडवगण फराटा , इनामगाव या ग्रामपंचायती सर्वसाधारण गटासाठी राहिल्या आहेत .
प्रवर्गानुसार ग्रामपंचायत निहाय आरक्षण पुढील प्रमाणे –
अनुसुचित जाती स्त्री करीता राखीव ग्रामपंचायती – मुखई , गोलेगाव ,वढु बुदृक , जांबूत
अनुसुचित जाती सर्वसाधारण करीता राखीव आरक्षण ग्रामपंचायती – आमदाबाद ,वाजेवाडी ,निमगाव म्हाळुंगी , हिवरे
अनुसुचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायत – वडगाव रासाई ,माळवाडी ,
अनुसुचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव – कुरुळी ,
नागरिकांचा मागास वर्ग ( महिला )प्रवर्गा करीता आरक्षित ग्रामपंचायती –
निमगाव भोगी , रावडेवाडी ,निमोणे ,नागरगाव ,पिंपळसुटी , पिंपळे जगताप ,पिंपरी दुमाला , सादलगाव ,म्हसे बुदृक ,शरदवाडी , वाडा पुनर्वसन , चव्हाणवाडी , कर्डे
नागरिकांचा मागासवर्ग ( ओबीसी सर्वसाधारण ) करीता आरक्षित- ग्रामपंचायती – वाघाळे  , अण्णापूर , खैरेवाडी , पारोडी , खंडाळे, फाकटे , कोळगाव डोळस ,मिडगुलवाडी कवठे येमाई ,आंधळगाव ,गणेगाव खालसा, कासारी , कान्हूर मेसाई , कारेगाव ,
सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता राखिव -आंबळे ,कळवंतवाडी , धानोरे ,
टाकळी भीमा , आपटी , केंदुर ,कोरेगाव भीमा ,चिंचोली मोराची ,शिंदोडी ,उरळगाव ,गणेगाव दुमाला ,पाबळ ,भांबर्डे ,बुरुंजवाडी ,खैरेनगर ,विठ्ठलवाडी ,आलेगाव पागा ,शिक्रापूर ,मोटेवाडी ,डिंग्रजवाडी ,कोंढापुरी ,पिंपरखेड,वरुडे ,निमगाव दुडे ,निर्वी ,बाभूळसर बुदृक , तर्डोबाचीवाडी ,न्हावरे , दरेकरवाडी ,गुनाट ,
सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे आरक्षण – ढोकसांगवी ,चिंचणी , शिरुर ग्रामीण , काठापूर खुर्द , वडनेर खुर्द , शिरसगाव काटा , टाकळी हाजी , चांडोह , करंदी , रांजणगाव सांडस , तांदळी , कर्डेलवाडी , मांडवगण फराटा , तळेगाव , सोने सांगवी , दहिवडी , सणसवाडी , मलठण , रांजणगाव गणपती , बाभूळसर खुर्द , संविदणे , सरदवाडी , जातेगाव बुदृक , धामारी , इनामगाव , जातेगाव खुर्द , खैरेवाडी , करंजावणे , पिंपरी खालसा ,
यावेळी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे , वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार , माजी सरपंच अरुण घावटे , विठठल घावटे , आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button