Uncategorizedविशेष

व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरणपूरक तुरटी गणपती समाजासाठी आदर्शवत उपक्रम

तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी व्हिजन इंटरनॅशनल स्कूल येथे भेट देऊन श्री गणेशाची आरती केली.

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम २४}शहरातील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र, यंदाचा उत्सव विशेष ठरला तो शाळेने पर्यावरणपूरक तुरटीपासून तयार केलेल्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून संपूर्ण समाजासाठी दिलेल्या आदर्श संदेशामुळे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समाजात रुजवण्यासाठी शाळेने घेतलेला हा उपक्रम स्थानिक पातळीवर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

विशेष म्हणजे या शाळेच्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन शहरातील ५१ पालकांनी व नगर परिषदेने देखील याच प्रकारच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरकतेला आपला पाठिंबा दर्शविला, ही बाब शिरूरकरांसाठी अभिमानाची ठरली.
या गणेशोत्सवाच्या काळात तब्बल पाचशेहून अधिक मान्यवरांनी विविध वेळेला शाळेत येऊन श्रींच्या आरतीचा लाभ घेतला. यामध्ये  तहसीलदार श बाळासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक  कारंडे, पी.एस.आय माधुरी. झेंडगे , माने मॅडम, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, पंचायत समिती शिरूरचे अधिकारी, रांजणगाव एमआयडीसीतील आयटीसी फुड, ब्रिटानिया, विल्स इंडिया, पेप्सिको, यूकेबी मेटल, अस्पा पेपर फॅक्टरी आदी कंपन्यांचे एच.आर. मॅनेजर्स, तालुक्यातील ३०-३५ गावांचे सरपंच, शिरूर मधील संवादिनी ग्रुप, पतसंस्था प्रतिनिधी, बचत गट, वकिल संघटना, डॉक्टर्स, पत्रकार बांधव, सर्व बँकांचे मॅनेजर्स, हाउसिंग सोसायटी चेअरमन-सेक्रेटरी, स्व. बाबुरावजी पाचरणे कृतिमंच ग्रुप, आरएसएस संघटन, पंचायत समिती शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
संस्थेचे अध्यक्ष  विकास पोखरणा यांनी  सांगितले की,
“गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव आहे. परंतु या उत्सवाला पर्यावरणपूरक दिशा देणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या घरगुती

डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

गणेशोत्सवात तुरटीपासून तयार केलेल्या मूर्तींचा स्वीकार करावा आणि समाजासाठी उपयोगी ठरणारे उपक्रम राबवावेत,”
असे आवाहन करून त्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.
कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, वकृत्व, तसेच विविध कलात्मक सादरीकरणे करून मान्यवरांची वाहवा मिळवली. त्यांच्या कलागुणांचे कौतुक करताना मान्यवरांनी व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमांचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. तसेच तालुक्यातील पहिले सीबीएससी मान्यताप्राप्त ज्युनियर कॉलेज म्हणून शाळेला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
या संपूर्ण उपक्रमामुळे शिरूर शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा एक प्रेरणादायी संदेश पोहोचला असून, शाळेने पुढील पिढ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी घेतलेली ही पुढाकारपूर्ण पावले खरोखरच कौतुकास्पद ठरली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button