Uncategorizedराष्ट्रीय
महाराष्ट्र दिनानिमित्त शिरुर तहसिल कार्यालयात आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या हस्ते झेंडा वंदन

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त शहरातील विविध शासकिय कार्यालये व शाळांमध्ये झेंडावंदन करण्यात आले .
तहसिल कार्यालय, शिरूर येथे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील, पोलिस निरीक्षक संदेश केंदळे, निवासी नायब तहसीलदार विनय कौलवकर, महसूल नायब तहसीलदार प्रकाश मुसळे यांच्या सह राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार , भाजपाच्या प्रिया बिरादार ,माजी नगरसेवक मंगेश खांडरे , शोभना पाचंगे , अविनाश जाधव आदी यावेळी उपस्थित होते .
विद्याधाम प्रशालेच्या गीतमंचाने यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले .
शिरुर नगरपरिषदेत मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन झाले . शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार ,माजी नगरसेवक संदिप गायकवाड , नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक राहूल पिसाळ आदी यावेळी उपस्थित होते .
विद्याधाम प्रशाला येथे मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले . मुख्याध्यापिका अश्विनी घारु ,
मुख्याध्यापिका ज्योती मुळे , संजय देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते .
ज्ञानगंगा विश्व विद्यालय , बालाजी विश्व विद्यालय , व्हिजन इंटरनॅशनल स्कुल, सी . टी . बोरा कॉलेज येथे ही झेंडावंदन झाले . डेक्कन स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शाळेच्या पालक संघाचे उपाध्यक्ष गजानन नानोटे , सचिव अक्षय कुलकर्णी , पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील शिक्षिका कोमल सुतार यांनी महाराष्ट्राच्या जडण घडणीची माहिती दिली.
शाळेतील विद्यार्थिनींनी जयोस्तुते या गाण्यावर भरत नाट्यम नृत्य सादर केले. प्राचार्य डॉ. ओंकार यांनी महाराष्ट्राच्या सर्वंकष विकासाचा आढावा घेतला . तसेच महाराष्ट्राच्या जडण घडणीत डेक्कन एज्युकेशन सोसायटी चे असलेले योगदान अधोरेखित केले. कु. स्वराली बोरकर हिने सूत्रसंचालन केले. शिक्षक प्रतिनिधी लवू धारजे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आज शहरातील विविध शाळांच्या वार्षिक निकाल ही जाहीर झाला . साहजिकच उत्तीर्ण झाल्याचा आनंदा प्रित्यर्थ विद्यार्थ्यानी पेढे वाटून आनंद साजरा केला . साहजिकच मिठाईचा दुकानात पेढे घेण्या करीता विद्यार्थ्यानी गर्दी केली होती .