Uncategorizedगुन्हेगारी
Uncategorizedगुन्हेगारी
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम ) बाभूळसर , ता . शिरुर येथे तेरा पत्त्यांचा रमी जुगार पैशावरती खेळत असताना सात जण मिळून आले असून त्यांच्याकडून २४ हजार ८०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मोबाईल व वाहने असा एकूण १२ लाख ५४ हजार ८०० रू. किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस हवालदार विलास सूर्यभान आंबेकर वय ४२ वर्षे , 1881 रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी १) बाळू कृष्णाजी बत्ते वय ४२वर्ष रा. रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे २ )नवनाथ सूर्यकांत थिटे वय ४३ वर्ष राहणार -न्हावरे,खंडागळे वस्ती, तालुका. शिरूर .जिल्हा पुणे , संतोष बाजीराव वाळके वय ४३ वर्ष, रा. करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे
,अमोल मारुती गायकवाड वय ३८ वर्ष रा.करडे तालुका. शिरूर, जिल्हा पुणे ,नाना विक्रम पवार रा. भांबर्डे तालुका शिरूर जिल्हा पुणे ,शशी वाळके रा.बाभूळसर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे ,गोकुळ गव्हाणे रा. न्हावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
७ मे २०२५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास बाभूळसर गावच्या भांबर्डे ते करडे रोड लगत एका शेतातील झाडाखाली
बाळू कृष्णाजी बत्ते ,नवनाथ सूर्यकांत थिटे,संतोष बाजीराव वाळके , अमोल मारुती गायकवाड ,नाना विक्रम पवार , शशी वाळके , गोकूळ गव्हाणे हे तेरा पत्त्यांचा रमी जुगार पैशावरती खेळत असताना मिळून आले असून त्यांच्याकडून २४ हजार ८०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मोबाईल व वाहने असा एकूण १२ लाख ५४ हजार ८०० रू. किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, संतोष आवटी, रामेश्वर आव्हाड, उमेश कुतवळ यांनी केली .याबाबतचा आधिक तपास सहाय्यक फौजदार शिंदे करत आहेत .