Uncategorizedराष्ट्रीयविशेष
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )
चित्रपटाची पटकथा, संकलन, असोसिएट दिग्दर्शन अशा विविध जबाबदाऱ्या अर्क यज्ञ (दिप सिम्फनीज) यांनी लिलया पेलल्या आहेत. चित्रपट क्षेत्राच्या पदार्पणातच दिग्दर्शक दीपक धारू यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, दिलावर सिकलकर यांनी उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी केली आहे व डीओपी नितीन लचके, डी. आय आर्यन भट यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.
कार्यकारी निर्माते दादा ननवरे आणि प्रॉडक्शन मॅनेजर आदर्श गोसावी, राधाकृष्ण कराळे यांनी प्रकल्पाची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित केली. अशोक शिंदे, सुधीर देशपांडे हे लाइन प्रोड्यूसर होते. चित्रपटातील गाणी अवंतिका मंडलिक आणि पियुष लोंढे यांनी सुंदरपणे सादर केली आहेत.
तर संगीत अर्क यज्ञ आणि संगीत निर्मिती सिद्धेश कुलकर्णी यांनी केली आहे आणि गीते जयंत लोकखंडे यांनी लिहिली आहेत, या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते प्रकाश धोत्रे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे तसेच सुप्रिया गट, कैलासवासी सुनील जगधने, रुपेश पसपूल, राधाकृष्ण कराळे, डॉ. सुरेश शिंदे, सुधीर कुलकर्णी, विलास गोसावी, विजयकुमार नेटके, प्रतिमा कुतवळ, विद्या जोशी, श्वेता गमे, सीमा धारू, शौर्य वाळसे, बालकलाकार युगांत कुतवळ, वीर धारू, आर्यन साखरे, अर्णव साखरे तसेच स्वतः दीपक घारू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, चित्रपटाच्या यशात अखिल भारतीय चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज भोसले निलेशजी भदाणे, ॲड. ओमप्रकाश सतीजा, विलास गोसावी, डॉ. संतोष पोटे, प्रवीण गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.