राजकीयविशेष

सामान्य कार्यकर्त्याना ताकद देणारे म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव यांचे नेतृत्व

माजी नगरसेविका अंजली थोरात

म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना मयूर थोरात , माजी नगरसेविका अंजली थोरात , शृतिका रंजन झांबरे

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४) सर्व सामान्य कार्यकर्त्यांना  ताकद देणारे व जनतेच्या विकासासाठी कटिबध्द असणारे नेतृत्व म्हाडाचे  सभापती व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या रुपाने मिळाले असल्याचे माजी नगरसेविका अंजली मयूर थोरात शिरुर येथे म्हणाल्या .

म्हाडाचे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील  यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजनांतर्गत शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप व निवासी आश्रमशाळा व मूकबधिर विद्यालयास किराणा वस्तू भेट व विद्यार्थ्याना खाऊ चे वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
 यावेळी बोलताना अंजली थोरात म्हणाल्या की शिवाजीराव आढळराव यांनी शिरुर शहरासाठी मोठ्या प्रमाणावर विकासासाठी निधी आणला  शहराची  पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे .
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात ,उपशहर प्रमुख भरत जोशी , शहर संघटक सुरेश गाडेकर ,दीपक फलके ,गणेश गिरे ,ॲड . शुभम माळी आदी उपस्थित होते .
दरम्यान शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात , माजी नगरसेविका अंजली थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रुतिका झांबरे, रंजनभैय्या झांबरे यांनी लांडेवाडी, ता आंबेगाव  येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार माऊली कटके, माजी आमदार अतुल बेनके. आशाताई बुचके, विष्णू काका हिंगे, देवेंद्र शहा, आदी उपस्थित होते. याप्रसंगी कल्पना आढळराव, अक्षय आढळराव, अपूर्व आढळराव आदी उपस्थित होते.
प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, मानसी नाईक यांनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण यावेळी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button