Uncategorizedआरोग्य

जागतिक परिचारिका दिन शिरुर मध्ये साजरा

ग्रामीण रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन

शिरुर ग्रामीण रुग्णालय येथे परिचारिका दिन निमित्त आयोजित कार्यक्रम

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)आरोग्य क्षेत्रात परिचारिका यांचे  योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिरुर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ .तुषार पाटील यांनी केले .१२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला  जातो. इसवी सन १८५४साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करणारी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. त्यानिमित्ताने 12 मे हा जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शिरूर ग्रामीण रुग्णालयात   वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार पाटील , आरोग्य कर्मचारी संदीप लंगडे गजानन टीमकरे ,अजित रायपूरकर ,आसमा मणियार ,प्रीती पवार ,किरण सोनवणे संदीप चव्हाण ,स्टाफ नर्स  यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button