Uncategorizedविशेष
आपल्या असामान्य कर्तुत्वातून स्वंत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उद्योजिका ,आदर्श सरपंच व सेवाभावी वृत्तीने सतत समाजासाठी झटणारे नेतृत्व म्हणजे वर्षा उर्फ रोहिणी फक्कडराव काळे ( पोटावळे )यांचा जन्मदिन १३ मे रोजी आहे त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्याच्या जीवनप्रवासचा आढावा
आपल्या असामान्य कर्तुत्वातून स्वंत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तर्डोबाचीवाडी येथील उद्योजिका ,आदर्श सरपंच व सेवाभावी वृत्तीने सतत समाजासाठी झटणारे नेतृत्व म्हणजे वर्षा उर्फ रोहिणी फक्कडराव काळे( पोटावळे )यांचा जन्मदिन १३ मे रोजी आहे त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ग्रामीण भागातील वर्षा काळे यांनी उद्योजक म्हणून केलेला प्रवास हा तरुण पिढीसाठी दिशादर्शक आहे .वर्षा यांचे वडील उल्हासराव हे शिक्षक होते. वडिलांनी केलेले मार्गदर्शन व संस्कार यातून वर्षा या घडत गेल्या. प्रतिकूल परिस्थिती आली तरी डगमगायचं नाही. त्याला तोंड द्यायचं व यशाच्या मार्गाकडे वाटचाल करत राहायचं या प्रमाणे वर्षा काळे यांचा जीवन प्रवास राहिलेला आहे .ग्रामीण भागातली एक मुलगी तर्डोबावाडीचे सरपंच म्हणून काम करते सरपंच म्हणून केलेल्या कामाची दखल घेत त्यांना आदर्श सरपंच म्हणून सन्मानित करण्यात येते . त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी व महिलांना रोजगार मिळावा त्यांना आर्थिक समृद्धी व स्वावलंबी होता यावं या हेतूने वर्षा काळे यांनी उद्योग क्षेत्रात प्रवेश केला .आज रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत सरदवाडी ,शिरुर या ठिकाणच्या त्यांच्या युनिट मधून अडीचशे हुन अधिक महिला व २०० हून आधिक पुरुष काम करतात. राजकारण समाजकारण ,अर्थकारण या सर्वच क्षेत्रात त्या सातत्याने कार्यरत आहे. त्यांच्या या वाटचालीत त्यांचे पती माजी सैनिक उद्योजक फक्कडराव काळे , आई , बहीण व भाउ यांची खंबीर साथ आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण करताना वर्षा यांनी आपल्या कुटुंबालाही वेळ देत कुटुंबालाही घडवले .त्यांचे चिरंजीव उच्चविद्याविभूषित असून कंपनीची जबाबदारी ते स्वंत : सांभाळतात .तर कन्या उच्चशिक्षित होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्याचबरोबर त्यांनी नुकतीच शैक्षणिक संस्था स्थापन केली असून या शैक्षणिक संस्थेद्वारे नर्सेसचे कोर्सेस सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर भविष्यात शिरूर परिसरात सर्व सुविधांनी युक्त असे शैक्षणिक संकुल उभे करून विविध कोर्सेस व शिक्षणक्रम शिरूर परिसरात त्यांना सुरू करायचे आहेत त्या दृष्टीने त्यांचे नियोजन सुरू आहे.