राष्ट्रीयविशेष

न्यायधीशपदी निवड झालेले ॲड . सुमेधा वाखारे ,ॲड . अक्षय ताठे, ॲड . शुभम कराळे , ॲड . सागर नळकांडे या चार जणांच्या शिरुर येथे सत्कार

माजी जिल्हा न्यायाधीश के . डी . कटके , चंद्रशेखर जाधव ,ज्येष्ठ्य विधीज्ञ ॲड .सुधाकर आव्हाड , ॲड . राजेंद्र उमाप यांची प्रमुख उपस्थिती

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)न्यायधीश म्हणून काम करताना प्रामाणिकपणा बरोबरच चारित्र्याला जपावे व विनम्र व अभ्यासू राहावे त्याच बरोबर मोहाचे क्षण टाळा असा सल्ला ज्येष्ठ्य विधिज्ञ ॲड . सुधाकर आव्हाड यांनी शिरुर येथे दिला. .शिरुर मधील ॲड .अक्षय ताठे , ॲड .सुमेधा वाखारे ,ॲड .शुभम कराळे , ॲड .सागर नळकांडे या चार जणांची न्यायधीशपदी निवड झाली. या चार जणांच्या घोडनदी बार असोसिएशनच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी शिरुरचे सहाय्यक न्यायाधीश डी. बी . डोमाळे ,ज्येष्ठ्य विधिज्ञ ॲड . सुधाकर आव्हाड , बार कॉंन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड .राजेंद्र उमाप ,निवृत्त जिल्हा न्यायाधीश के .बी कटके ,निवृत्त जिल्हा न्यायाधीश चंद्रशेखर जाधव , पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड . अशोक संकपाळ , पुणे जिल्हा बार असोसिएशनचे सचिव ॲड . पृथ्वीराज थोरात , शिरुर बार असोसिएअशनचे अध्यक्ष ॲड .अमित खेडकर ॲड संजय बेंद्रे यावेळी उपस्थित होते .
ॲड . सुधाकर आव्हाड म्हणाले की
आपल्या कामाची प्रामाणिकपणाची , चारित्र्याची सूक्ष्म नोंद होत असते.सर्वांना दुरुस्त करणारा ,सर्वांवर वचक ठेवणारा व आपल्या चारित्र्यातून समजावून सांगणारा न्यायधीश चूकला तर देश कोसळायला वेळ लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला .लोक मोठ्या अपेक्षेने व आशेने न्यायपालिकेकडे पाहत आहेत .
न्यायधीश रामशास्त्री प्रभूणे व सर एडवर्ड सारखे न्यायाधीश व्हा असे आव्हाड म्हणाले .
शिरुरचे सहाय्यक न्यायाधीश डी. बी . डोमाळे म्हणाले की कायदाच्या चौकटीत राहून सद्सदविवेक पध्द्तीने नियमाचे पालन करुन न्यायदानाचे काम करावे लागते  . शिस्त व स्वयंशिस्त ही महत्वाची आहे .
माजी जिल्हा न्यायाधीश चंद्रशेखर जाधव म्हणाले की रिस्पेक्टिव्ह डिस्टन ठेवून न्यायधीश म्हणून काम करावेसाधी राहणी व उच्च विचारसरणी ठेवावी.
माजी न्यायधीश के .बी कटके म्हणाले की सकारात्मक विचार असेल तर अवघड काहीच नाही .
ॲड . राजेंद्र उमाप यावेळी म्हणाले की शिरुर तालुक्यातील राजेंद्र अवचट हे उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत . शिरुरचे मागील दोन वर्षात प्रत्येकी दोन जण न्यायधीश झाले तर यंदा चार जण न्यायाधीश झाले आहेत . एकूण २० हून आधिक जण शिरुर तालुक्यातील न्यायधीश म्हणून कार्यरत आहे .सेशन कोर्ट व एडीजी कोर्ट शिरुरला व्हाव या साठी प्रयत्न करण्यात येत आहे . घोडनदी बार असोसिएशनमधून आधिकाधिक जणांनी न्यायधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत न्यायक्षेत्रात प्रामाणिकपणे काम करा कोणतीही अडचण येणार नाही असे उमाप म्हणाले .
सत्काराला उत्तर देताना ॲड . सुमेधा वाखारे म्हणाल्या की मी विद्याधाम प्रशालेतून शिक्षण घेतले .दुस-या प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले . सकारात्मक विचार ठेवुन प्रयत्नातील सातत्य कायम ठेवावे यश नक्की मिळेल .
ॲड .अक्षय ताठे व ॲड .सागर नळकांडे यांनी सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .ॲड .शुभम कराळे म्हणाले की सन २०२१ ठरवले की न्यायधीश व्हायचे .
यासाठी नियमित अभ्यास केला . अभ्यासातील नियमितता तुम्हाला यश मिळवून देईल असे कराळे म्हणाले .
यावेळी ॲड .अशोक संकपाळ ,ॲड . बाजीराव वाखारे ,ॲड. संजय वाखारे , ॲड .महिपती काळे , ॲड .संजय शेंडगे , ॲड .वीरेंद्र सांवत, ॲड . दिलिप कांबळे ,ॲड.पाटोळे , ॲड .दोरगे , ॲड.उषादेवी बढे , ॲड .वसंत उबाळे ,ॲड .परेश थोरात ,ॲड. भोलेनाथ पडवळ , ॲड . शिरीष लोळगे , ॲड . संजय बेंद्रे आदीची मनोगते झाली .यावेळी ज्येष्ठ्य विधीज्ञ ॲड .सुभाष गायकवाड , ॲड .बी.के दिघे , ॲड .सुभाष पवार , ॲड .राजेंद्र शितोळे , ॲड .किरण आंबेकर ,ॲड .प्रदीप बारवकर ,ॲड. संजय ढमढेरे , सेवानिवृत्त प्रा .डॉ . दिपक गायकवाड , ॲड . संयोगिता पाटील , ॲड .अमृता खेडकर ,ॲड . सुवर्णा वाघमारे , ॲड .यमराज शिंदे ,ॲड .गौरव बाफना ,ॲड.प्रणव घाडगे , ॲड . सागर गायकवाड  बाबूराव पाचंगे आदी उपस्थित होते .
याप्रसंगी प्रास्ताविक शिरुर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड . अमित खेडकर यांनी केले . सूत्रसंचालन ॲड .साहेबराव जाधव यांनी केले . आभार ॲड . सतीश गवारी यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button