Uncategorizedक्राईम
पाहण्यासाठी गळ्यातील दिड तोळ्याची सोन्याची चैन (किंमत 1,40,000 रुपये) मागितली. विश्वास ठेवून चैन दिल्यानंतर चैन स्वतःच्या गळ्यात घालून गाडी घेऊन पोबारा . – तरुणीची पोलीसांकडे फिर्याद
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -) –
इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरुणाने विश्वास संपादन करून दिड तोळ्याची सोन्याची चैन घेऊन परत न केल्याने एका तरुणीने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार
शिरूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 555/2025 भा. न्या. संहिता कलम 316(2) प्रमाणे फिर्यादी तरुणीने पवन आंबादास सुरवसे (रा. डिसलेवाडी, जामखेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, तिची आरोपी पवन सुरवसे याच्याशी इंस्टाग्रामवरून गेल्या दोन महिन्यांपासून ओळख होती. 24 जुलै रोजी पवन सुरवसे याने तिला व तिच्या मैत्रिणींना लोणावळाला फिरायला नेले होते.
परत शिरूरला आल्यानंतर 26 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता शिरूर येथील फिर्यादीच्या घरी समोर आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोन्याची चैन (किंमत 1,40,000 रुपये) पाहण्यासाठी मागितली. विश्वास ठेवून तिने चैन दिल्यानंतर आरोपीने ती चैन स्वतःच्या गळ्यात घातली व गाडी घेऊन पळून गेला.

फिर्यादीने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही आरोपीने फोन उचलला नाही. चैन परत देण्यास नकार दिल्याने व टाळाटाळ केल्याने अखेर फिर्यादीने पोलिसांत तक्रार दिली.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे व जगताप करत आहेत.