Uncategorized

मानसिक तणावामुळे केली आत्महत्या

शिरूर  दिनांक (वार्ताहर ) :
शिरूर शहरालगत  रामलिंग रोड परिसरात राहणाऱ्या सुरेश गुरूबा काळे (वय ४०) रा . रामलिंग रोड रामलिंग शिरुर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ३० जुलै) सकाळी १० वाजता उघडकीस आली.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अ. म. रजिस्टर नं. १०४/२०२५, कलम भा. न्या. सं. १९४) करण्यात आली आहे. याबाबत मयताचे मेव्हणे विलास मोतीराम घोलप (वय ५०, रा. ओमरूद्रा कॉलनी, शिरूर) यांनी खबर दिली आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुरेश काळे हे काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. दि. ३० जुलै रोजी त्यांनी राहत्या घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचा मार्गदर्शनाखाली  हवालदार भगत करत  आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button