Uncategorizedशैक्षणिक

डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडियम स्कूलचा सलग तीसरा वर्षी दहावीचा१००% निकाल

शिरुर (डेली न्यूज पोस्ट टीम ) डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर चा इयत्ता दहावी चा निकाल यंदाही म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के लागलेला आहे. कुमारी प्रिया अमोल नरवडे हि 90.80 टक्के गुणांसह विद्यालयात प्रथम आलेली आहे.
कुमार उत्कर्ष भाऊसाहेब रवंदळ याने 82.7% गुणांसह द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच कुमारी तनिषा अविनाश लष्करे हिने 80.40 % गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
आज  सर्व दहावी चे उत्तीर्ण विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत उपस्थित होते. शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य  व्हि. डी . कुलकर्णी, गणेश  मराठे , शाळेचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार  यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे देवून कौतुक आणि अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button