अपघात
शिरुर तहसिल कार्यालया समोरील रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर असणा-या लाईटीचा खांबाना एस. टी बसेस ने जोरदार धडक दिली . धडकेत रस्त्याच्या दुभाजकावरील दोन वीजेचे खांब उन्मळून रस्त्यात आडवे .


हा अपघात आज संध्याकाळी १० च्या सुमारास झाला. शिरुर डेपोची तुळजापूर शिरुर ही एस . टी बस( एमएच ४० वाय ५८२८ )शिरुर शहरातून जात असणा-या पुणे अहिल्यानगर मार्गावरुन शिरुरकडे जात असताना शिरुर तहसिल कार्यालया समोर रस्त्याच्या मध्यभागी असणारा वीजेचा खांबास बसने जोरदार धड्क दिली . धडके नंतर मोठा आवाज झाला व वीजेचा खांब रस्त्यात आडवा झाला . अपघात नेमका कसा झाला याचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही .