Uncategorizedअपघात
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
-
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कोळपे हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव अज्ञात वाहनाने धडक देऊन चालक फरार झाल्याची घटना गुरुवारी (दि. २२) रात्री घडली.
या अपघातात युवक गंभीर जखमी झाला असून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत साबळे यांना जोरदार धडक दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कोथळकर करीत आहे.