क्राईम

ओमनी व्हॅनच्या टपावर हातगाडी वाहतूक; चालकावर पोलिसांची कारवाई

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांच्या जिवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ओमनी व्हॅनच्या टपावर लोखंडी हातगाडी व खोरे ठेवून वाहतूक करणाऱ्या चालकावर शिरूर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सतरा कमान पुलाजवळ करण्यात आली.

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विरेंद्र भानुदास सुंबे (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास दत्तु म्हस्के (वय ३५, रा. वडारवाडी, भिंगार, जि. अहिल्यानगर) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८५ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २३) सकाळी अकराच्या सुमारास शिरूर येथील सतरा कमान पुलाजवळ आरोपी ओमनी व्हॅन (एमएच १४ बीसी २३१८) चालवत होता. वाहनाच्या टपावर लोखंडी हातगाडी व खोरे ठेवून वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत होता.

तपासादरम्यान चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना तसेच वाहनाची आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित वाहन चालकावर गुन्हा दाखल केला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वाघमोडे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button