Uncategorizedक्राईम

घरफोडी टोळी जेरबंद – पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई


शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम-24 )शिरूर ते न्हावरा रोडवरील न्यू सागर रेस्टॉरंट अँड बार येथे झालेल्या घरफोडी व दारू चोरीचा गुन्हा उघडकीस आणत, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत घरफोडी टोळीचे तीन सदस्य जेरबंद केले असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा कार देखील जप्त केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅनेजर कुमार दिलीप जाधव (वय २३, रा. कडे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली होती.त्यानुसार
शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५४८/२०२५ भा.दं.वि. कलम ३३४(१), ३०५ प्रमाणे दि. २७ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात आरोपींनी रेस्टॉरंटचे शटर तोडून आत प्रवेश करत बिअर बॉक्स व विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण रु. ६१,८२० किंमतीचा मुद्देमाल चोरीस नेला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पथकाने तपास सुरू ठेवत दि. ५ ऑगस्ट रोजी कामशेत परिसरातून संशयित इनोव्हा कार (क्र. एम.एच.-43 ई एल -1600) व आरोपींचा शोध लावला.
१) ताजुद्दीन दस्तगीर शेख (वय २५, रा. टाकळवांडे, ता. फलटण, जि. सातारा) व २) गारेखनाथ काहू उर्फ काळूराम जाधव (वय ३४, रा. बोरखेडी, ता. शेणगाव, जि. हिंगोली) यांनी
तपासादरम्यान गुन्ह्याची कबुली देत सुनील दत्तू राउत (रा. राउतवाडी, कामशेत) याचाही सहभाग असल्याचे सांगितले.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार हस्तगत करण्यात आली असून चोरीचा मुद्देमाल कुठे विकला याचा तपास सुरू आहे .न्यायालयाने आरोपींना दि. ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी . प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे तसेच तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, सागर धुमाळ यांनी केली. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button