Uncategorized

५० हजार रु किमंतीची सापडलेली सोन्याची अंगठी प्रामाणिक पणे ज्यांची आहे त्यांच्या कडे सुपूर्त.वैभव हॉटेलचे अनिल सोनवणे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक

ÔÒशिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
पन्नास हजार हून आधिक किमंतीची सोन्याची अंगठी त्यांना सापडली .
ही अंगठी व त्यासोबतची कागदपत्रे प्रामाणिकपणे ज्यांची आहेत त्याच्या कडे सूपूर्त करत जगात प्रामाणिकपणा कायम असल्याचे उदाहरण हॉटेल व्यवसायिक व हॉटेल वैभवचे मालक अनिल सोनवणे यांनी दाखवून दिले .
त्याच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
सध्या ‘ माझे ते माझ आणि तुझ ही माझ ‘ अशी स्वार्थी प्रवृत्ती बोकाळत असताना सोनवणे यांचा प्रामाणिकपणा आधिकच उठून दिसतो .

Oplus_16908322


अनिल सोनवणे यांचे पुणे – अहिल्यानगर महामार्गावर शिरुर येथील बो-हाडे मळा येथे हॉटेल वैभव नावाचे हॉटेल आहे . या हॉटेल मध्ये नियमित पणे खवय्यांची गर्दी असते . नेहमी प्रमाणे रात्री हॉटेलची आवरावर करुन सोनवणे हे घरी जायला निघाले असता . त्यांना हॉटेलचा वाहन पार्किंगचा जागेत एक पाकिट पडलेले दिसले .सोनवणे यांनी हे पाकिट उचलले . पाकिटात अंगठी सह महत्वाची कागदपत्रे होती . त्यानंतर दोन दिवस त्यांनी हे पाकिट घेण्यासाठी कोणी तरी येईल याची वाट पाहिली . पण कोणीच न आल्याने त्यांनी पाकिट पोलीसांकडे जमा केले व पोलीसांच्या उपस्थितीत ज्यांचे पाकिट होते त्याच्या कडे ते सूपूर्त केले .
अनिल सोनवणे म्हणाले आई वडिलांची शिकवण आहे की बिनकष्टाच , बिन मेहनतीचे धन नको. आपल्या घामातून व कष्टातून मिळालेल्या एक रुपया ही लाख मौल्याचा असतो. ही जाणिव ठेवून व जे आपले नाही जे ज्याचे आहे त्याला मिळालेच पाहीजे. आपल आपल्याला मिळेलच या विचारातून सापडलेली ५० हजाराहून आधिक मूल्य असणारी सोन्याची अंगठी जेव्हा सापडली तेव्हा ती ज्याची आहे त्याकडे कशी पोहचवता येईल याचा विचार करत होतो .
दोन दिवस अंगठी संदर्भात कोणी विचारायला येईल याची वाट पाहिली पण कोणीच आले नाही . त्यानंतर सोन्याची अंगठी ,पोस्ट बचत खात्याची पुस्तक व चेक बुक , अधारकार्ड या सर्व वस्तू असणारे पाकिट पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या कडे सूपूर्त केले .
केंजळे यांनी पाकिटातील आधार कार्ड पाहिल . आधार कार्ड वरील नाव व मोबाईल वरुन शालिकराम सुरडकर छत्रपती संभाजीनगर
यांच्याशी संपर्क साधला पोलीस स्टेशन मधून फोन आला म्हटल्यावर सुरुवातीस फोन कश्यासाठी असेल असा प्रश्न त्यांना पडला . तुमच पाकिट अंगठी व आधारकार्ड सापडल असून ते तुम्ही घ्यायला या अस पोलीसांनी सांगितल्यावर त्यांना आनंद झाला .
व ते शिरुर पोलीस स्टेशन मध्ये आले .त्याठिकाणी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , वैभव हॉटेलचे अनिल सोनवणे , मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे, प्रा
. सतीश धुमाळ , मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर , हुडको कृति समितीचे शैलेश जाधव ,सतिश केदारी , महिला पोलीस भाग्यश्री जाधव  यांच्या उपस्थितीत हे पाकिट व अंगठी सुरडकर यांच्याकडे सूपूर्त करण्यात आली .
सुरडकर यांनी सोनवणे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचे आभार मानले .अनिल सोनवणे सारखी प्रामाणिक निस्वार्थी परोपकारी माणस यांच्या चांगुलपणाचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे ते म्हणाले .जगात चमत्कार घडू शकतो असे सांगून सोनवणे यांच्या रुपात देवदूतच भेटल्याचे त्यांनी सांगितले .
सुरडकर हे सेवानिवृत्त व्यवस्थापक असून पुण्याहून कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर येथे चालले असता जेवण्यासाठी हॉटेल वैभव येथे थांबले होते . पाकिट गहाळ झाल्याचे लक्षात आल्यावर बरीच त्यांनी शोधाशोध केली होती . गहाळ झालेले पाकिट व अंगठी मिळाल्यावर सुरडकर यांना आनंदाश्रू आले. पोलीस निरीक्षक संदेश केंजाळे यांनीही सोनवणे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
सध्या सर्वत्र स्वार्थ बोकाळत असताना अनिल सोनवणे सारखी माणसे प्रामाणिकपणा व खरेपणाची ज्योत तेवत ठेवत असून ही ज्योत दीपस्तंभा सारखी सर्वाना मार्गदर्शन करणारी आहे.
अनिल सोनवणे हे लहानपणापासुनच कष्टाळू आणि प्रामाणिक आहे . हॉटेल व्यवसायात आनिल सोनवणे  मोठी मेहनत घेतात  . त्याच्या प्रामाणिकपणाचा सर्वांनी आदर्श घ्यावा व सजग व जबाबदार  नागरिक म्हणून सर्वानी रहावे असे सतिश धुमाळ म्हणाले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button