स्थानिक

नगरपरिषदेच्या जागेत बेकायदेशीर मशिनरी साहित्य ठेवल्याने २५ हजार रु चा दंड


शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरूर नगरपरिषद हद्दीतील कल्याणी भेळ समोरील नगरपरिषदेच्या जागेत बेकायदेशीर मशिनरी साहित्य ठेवल्याने शिरुर नगरपरिषदेने टोरंट गॅस प्रा. लिमिटेड, वर्ड ट्रेड सेंटर खराडी यांच्यावर २५ हजार रु .ची दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी दिली .
ते म्हणाले की यासंदर्भात मनसेचा वतीने पालिकेकडे तक्रार करण्यात आली होती . शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम  पाटील यांनी याबाबत व्यवस्थापक,टोरंट गॅस प्रा. लिमिटेड, वर्ड ट्रेड सेंटर खराडी यांना
शिरूर नगरपरिषद हद्दीतील कल्याणी भेळ समोरील नगरपरिषदेच्या जागेत बेकायदेशीर मशिनरी साहित्य ठेवल्याने दंडात्मक कार्यवाही बाबत पत्र दिले आहे .
शिरूर नगरपरिषद भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे कंपनीचे काम चालू आहे. या कामास नगरपालिकेकडून खोदकाम करणेसाठी परवानगी देणेत आली आहे. सदर कामाच्या ठिकाणी कल्याणी भेळ समोरील नगरपरिषदेच्या जागेत कोणतीही परवानगी न घेता मशीनरी ठेवल्याचे दिसून आले होते. या ठिकाणची स्थळ पाहणी करून ४८ तासात कंपनीस खुलासा सादर करण्यास कळविले होते. परंतु सबंधित विषयावर कंपनीकडून कोणताही खुलासा प्राप्त झाला नाही.
त्यानुषंगाने पालिकेने दंडात्मक कार्यवाही करत २५००० रकमेचा दंड केला आहे . असे सय्यद यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button