Uncategorizedराष्ट्रीयविशेष
शिरुर तहसिल इमारत ग्रीन बिल्डिंग होणार
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शिरुर तहसिल कार्यालयाची संपूर्ण इमारत ग्रीन बिल्डिंग होणार असून इमारतीसाठीची सोलर प्रकल्पाचे टेंडर मंजूर झाली असून जलद व गतीमान महसूल सेवा देण्याचा दृष्टीने कार्यरत असल्याची माहिती तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली .


यावेळी नायब तहसिलदार विनायक कौलकर , तालुका पुरवठा निरीक्षण आधिकारी सदाशिव व्हनमाने आदी उपस्थित होते .
म्हस्के यांनी विविध कामांची माहिती देताना त्यांनी सांगितले की शिरुर तहसिल कार्यालयात सोलर प्रकल्प बसविण्यात येणार असून संपूर्ण कार्यालयास याद्बवारे वीजपुरवठा होणार आहे . त्याखेरीज १०० दिवसाच्या शासनाच्या कार्यक्रमा अंतर्गत इमारत व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे .
इमारत डागडुज , इलेक्ट्रीक कामे, फर्निचर व अन्य कामांकरीता २ कोटीचा निधी शासनाकडे मागण्यात आला आहे .
आतापर्यत ४१ पाणंद रस्ते खुले करण्यात आले असून १७१ वहिवाटीचा रस्त्याचे संदर्भात निकाल देण्यात आले आहेत . तहसिल कार्यालयातून उत्प्नन्न , डोमासाईल , जातीचे सह अन्य ८७ हजार दाखल्याचे वाटप मागील दोन वर्षात करण्यात आल्याचे म्हस्के यांनी सांगितले .
शिरुर तहसिल कार्यालयात २२ लाख विविध शासकिय कागदपत्राचे रेकॉर्ड असून आता पर्यत २ लाख कागदपत्राचे स्कॅनिंग करण्यात आले आहे . पुढील अडीच महिन्यात संपूर्ण २२ लाख कागदपत्राचे स्कॅनिंग पूर्ण करण्याचा मानस असून हे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना कागदपत्रे ऑनलाईन मिळून जलद प्रशासन सेवा उपलब्ध होईल असे म्हस्के यांनी सांगितले.
म्हस्के म्हणाले की संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ११६४ व श्रावणबाळ योजने अंतर्गत ११६४ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून ८ प्रकरणे अपात्र ठरले आहेत .
शिरुर तालुक्यात सध्या ८० हजार ५३ शिधापत्रिका धारक आहेत . मागील दोन वर्षात ११ हजार ९४८ नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या असून ३५१४२ त्याचे लाभार्थी आहेत . यात अंत्योदय -२०३ , प्राधान्य कुटुंब -७७३५ ,बिगर प्राधान्यक्रम – ४०१० शिधापत्रिका असल्याचे म्हस्के यांनी सांगितले .



