

तत्पूर्वी सायंकाळी शिरुर शहरातून जाणा-या पुणे -अहिल्यानगर महामार्गाने साईबाबा पालखी सोहळ्याने शिरुर शहरात प्रवेश केला. यावेळी ठिकठिकाणी गुलाबपुष्पांच्या पायघड्या घालून साईनामाचा गजर करण्यात आला .

पालखी सोहळा पाबळ फाटा, शिरुर बसस्थानक , जुने नगरपरिषद कार्यालय , विद्याधाम प्रशाला मार्गे साई मंगल गार्डन येथे मुक्कामासाठी विसावला .त्याठिकाणी स्वागत व महाप्रसादाची व्यवस्था विजय साखला परीवाराचा वतीने करण्यात आली होती . साईबाबांची आरती व दर्शनासाठी साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती .आज सकाळी पालखी सोहळ्या पुणे अहिल्यानगर रस्त्यावरुन शिरुर तहसिल कार्यालया समोरुन जोशीवाडी कडे मार्गस्थ झाला .यावेळी पालखीच्या अग्रभागी एकलव्य ढोल ताशा पथक होते . पुणे नगर महामार्गावरील घोडनदीवरील सतरा कमानीचा पुलाजवळ पालखी सोहळा पोहचल्यावर नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडला . रिंगण सोहळाच्या ठिकाणी आकर्षक अश्या रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. साईनामाचा गजर करीत मोठ्या उत्सहात रिंगण सोहळा पार पडला . मानाच्या अश्वाने प्रदक्षिणा घालत गोल रिंगण पूर्ण केले .

यावेळी पालखी सोहळ्याचे मंदार शहाणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले , माजी सचिव पोपटराव ढोकले , ॲड. सुप्रिया साकोरे ,

माजी नगरसेविका ज्योति लोखंडे , रोहिणी बनकर , कविता वाटमारे , पुणे जिल्हा भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष राजूभाई शेख , चित्रपट निर्माते डॉ . संतोष पोटे , डॉ . सुनिता पोटे , गोरक्षनाथ दातखिळे ,शिवसेनेचे सुनील चौधरी ,माजी उपसरपंच गणेश खोले ,मुकेश वर्मा , सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश फुलडाळे , किरण बनकर ,


