यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार निखील सोहरायसिंग रवानी वय 19 वर्ष, मुळ रा. बोराडेमळा शिरूर ता. शिरूर जि. पुणे. सध्या माटुंगा यांनी अज्ञात वाहन चालक विरोधात फिर्याद दिली आहे .

हा अपघातरात्री साडे अकरा ते पावणेबाराचा दरम्यान सरदवाडी येथे झाला . सोहरायसींग पुनवासीसींग रवानी व त्याच्या पत्नी शारदा रवानी हे दुचाकी क्र. एम. एच. 12 एस. डब्ल्यु. 4375 जात असताना भारत पेट्रोलपंपासमोर अज्ञात चारचाकी वाहन चालकाने मोटार सायकलला पाठीमागुन ठोस मारली त्यात मोटार सायकल वरील रहानी पती पत्नी हे गंभीर जखमी झाले . अपघाताची खबर न देता वाहनचालक पळुन गेला.

अपघाताचा आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगत करीत आहेत .

