विशेष

सेंट चावरा शाळेस १ लाख रु दंड शासनाने ठोठवला

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांची माहिती


शिरुर :  ( डेली न्यूज पोस्ट टीम 24 )
सरदवाडी  , ता शिरुर येथील सेंट चावरा स्कुलला मराठी माध्यमाची परवानगी असताना इंग्रजी माध्यमातून शाळा चालविली जात असल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी शासनाकडे तक्रार केली होती .
या तक्रारीची दखल घेत
शासन मान्यता प्रमाणपत्रा शिवाय शाळा अनाधिकृतपणे चालू असल्याचे घोषित करुन या शाळेच्या व्यवस्थापन संस्थेस शासनाने १ लाख रु. चा दंड ठोठवला असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी दिली .
सय्यद यांनी सांगितले की   सरदवाडी , ता. शिरुर मधील सेंट चावरा स्कूल  संदर्भात गट शिक्षणाधिकारी शिरुर यांच्या कडे तक्रार केली होती .या संदर्भात गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना कोणती कारवाई करावी याबाबतचे मार्गदर्शन मागितले होते .त्यानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्गदर्शन घेतल्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी ११ मार्च २०२५ रोजी सेंट चावरा स्कूलला अनाधिकृत शाळा बंद करण्याबाबतचे व दंडा बाबतचे पत्र दिले असल्याचे सय्यद यांनी सांगितले .
शाळेस १ लाख रु चा दंड भरणे बंधनकारक असून चालू शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळेत समायोजन करुन तसा अहवाल गटशिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करण्यास ही शाळेला सांगण्यात आले असल्याचे सय्यद म्हणाले .पुढील शैक्षणिक वर्षात शासन मान्यता मिळाल्याशिवाय शाळा सुरु केल्यास प्रति दिवशी १० हजार रु . दंड ठोठविण्यात येईल व नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेला दिलेल्या पत्रात म्हटल्याचे सय्यद यांनी सांगितले . सरदवाडी येथील  सेंट चावरा स्कुल संदर्भात तक्रार करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष महिबूब सय्यद , शिरुर प्रवासी संघाचे   अध्यक्ष अनिल बांडे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटक अविनाश घोगरे , शहराध्यक्ष ॲड . आदित्य मैड , रवि लेंडे यांनी  सातत्याने पाठपुरावा केला त्यास यश आल्याचे ही सय्यद यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button