Uncategorizedविशेषशैक्षणिक

रयत शाळेचे माजी विद्यार्थी सरसावले शाळेचा विकासकामांसाठी .३ लाखांची देणगी दिली

 

शिरुर  ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४) येथील न्यू इंग्लिश स्कूल रयत शाळेचे माजी विद्यार्थी शाळेच्या विकासासाठी पुढे सरसावले असून माजी विद्यार्थ्यांचा सहभागातून विविध विकास कामे करण्यात येत असून या विकासकामाचे भूमीपूजन करण्यात आले .त्याचवेळी माजी  विद्यार्थ्यांच्या मेळावा व स्नेहसंमेलन ही घेण्यात आले  .

       यावेळी रयत शाळेच्या मॅनेंजिंग कौन्सिल सदस्य जाकिरखान शहिदखान  पठाण ,  शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ . राहूल घावटे , माजी विद्यार्थी सिंहगड  अभियांत्रिकी  कॉलेजचे प्राचार्य डॉ . शंकर नवले , पंचायत समितीचे माजी सदस्य आबासाहेब पाचुंदकर , माजी सरपंच अरुण घावटे , सोमनाथ घावटे ,,रामलिंगचे माजी उपसरपंच बाबाजी वर्पे , संजय शिंदे ,माजी सरपंच प्रकाश थोरात , व्यवसायिक राजेश ढवळे , महेश भोसले , मुख्याध्यापक एस. एच . मचाले , उपमुख्याधापक व्ही . बी . खोमणे , पर्यवेक्षक ए .के .सरोदे आदी यावेळी उपस्थित होते .शिरुर येथील रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेह संमेलन व माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात  शाळेच्या विविध विकास कामासाठी सुमारे तीन लाख रुपये देणगी देण्यात आली.संस्थेच्या  सन -१९८७ , सन १९९७ व सन १९९३ या वर्षातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित जमत स्नेह मेळावा आयोजीत केला होता .रयत शिक्षण संस्थेतुन घडलेल्या विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी एकत्रीत येत संस्थेच्या विविध कामांसाठी निधी जमा करण्याचे आवाहन केले .यातुनच सन १९८७ , १९९७ , व सन -१९९३  या शैक्षणिक वर्षातील  इयत्ता दहावीतील  विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिरुर येथील संस्थेच्या प्रांगणात पेव्हिंग ब्लाॅक बसवणे तसेच विविध कामासाठी सुमारे तीन लाख रुपये निधी जमा केला .हा सर्व जमा केलेल्या निधीचा धनादेश रयत शिक्षण संस्थेचे सदस्य जाकिरखान पठाण यांच्याकडे सपुर्त करण्यात आला.

रयत शिक्षण संस्थेतुन आज पर्यंत लाखो विद्यार्थी घडले असुन संस्थेतील प्रत्येक माजी विद्यार्थी संस्थेप्रती ऋण व्यक्त करत असतात .याचाच एक भाग म्हणुन संस्थेच्या विविध कामांसाठी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्यासाठी एकत्र येत संस्थेच्या कामांसाठी केलेली मदत ही नक्कीच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार जाकीरखान पठाण यांनी काढले .
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिद हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आज जोपासत असताना घडलेल्या पिढीने पुढच्या पिढीसाठी केलेल्या या  अमुल्य योगदानावरच संस्थेच्या वाटचालीस मोठा हातभार लागत असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button