Uncategorizedविशेषशैक्षणिक
५० वर्षांनंतर जुन्या शाळेचा वर्ग पुन्हा भरला!



शिरुर, ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, सरस्वती पूजन आणि प्रार्थनेने झाली. राष्ट्रगीत राम धुमाळ (आलेगाव) यांनी सादर केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. बालपणीचे मित्र-मैत्रिणी आपल्या कार्यक्षेत्रात किती पुढे गेले आहेत, हे पाहून सर्वांनाच आनंद झाला.
विजयकुमार गोरे, उषा चौधरी, दत्तात्रेय निंबाळकर, शिवाजीराजे निंबाळकर आणि ज्ञानदेव काळे यांनी यावेळी आपल्या मनोगतातून आठवणी, भावना आणि कृतज्ञता व्यक्त केली.
