Uncategorized

पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्री देवराईत तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते वृक्षारोपन

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरुर शहरातून जाणा-या पुणे अहिल्यानगर रस्त्या शेजारील डोंगरावर सह्याद्री देवराई शिरुर येथे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के  यांच्या हस्ते  वृक्षारोपन करण्यात आले .
यावेळी प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालयाचा शंकुतला बहेनजी , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप , प्रा. चंद्रकांत धापटे , सह्याद्री देवराई शिरुरचे महिबूब सय्यद , ॲड . आदित्य मैड , राहुल निकुंभ , बाजार समितीचे माजी सचिव दिलिप मैड , गोपीनाथ पठारे , रवि लेंडे , माजी प्राचार्य दिलिप देशमुख , अविनाश घोगरे बाळासाहेब आवारी , माजी शिक्षक अशोक शेळके, कैलास घाडगे , फकृउद्दीन शेख , आदी उपस्थित होते .
पर्यावरणाचा बिघाड मानवानेच केला असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवालाच पुढाकार घ्यावा लागेल असे शंकुतला बहेनजी म्हणाल्या .
तहसिलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले की पर्यावरण जपणे काळाची गरज आहे . पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी निसर्ग संवर्धन करावे लागेल हवा पाणी व जमिन या सर्वांवर काम करुन पर्यवारण सवंर्धन करण्याची प्रतिज्ञा करावी असे ते म्हणाले .
येथील सह्याद्री देवराई शिरुर यांच्या वतीने हॉटेल अंबिका शेजारील डोंगरावर वड , चिंच , जांभूळ , पिंपळ , लिंब अशी झाडे लोकसहभागातून लावण्यात आली असून या झाडांचे संवर्धन व निगा राखली जाते .
पर्यावरणाचा होत असलेल्या -हास ,बदलते हवामान या परिस्थितीत प्रत्येकांने आपआपल्या परिसरात वृक्ष लावणे व त्यांचे संवर्धन केले पाहीजे .
पर्यावरक जीवनशैलीचा अवलंब करुन पुढच्या पिढीसाठी निसर्ग जपून ठेवला पाहीजे . अश्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या .
येथील डेक्कन स्कूल मध्येही जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नारळ, केळी, सुपारी, रक्तचंदन, बेल, चाफा , लिंब आदीची झाडे लावण्यात आली . गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर , डेक्कन स्कूलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार, शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे, शिक्षक प्रतिनिधी लवू धारजे आदीच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले .
. महाराष्ट्र शासनाच्या ‘ एक पेड माँ के नाम ‘ या उपक्रमाची सुरूवात देखील यावेळी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेतील ७० मुलांना एक झाड देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या झाडाचे संगोपन करायचे आहे. या वेळी अमोल वाघमारे, सखाराम पुरी, चंद्रकांत झांजे, रत्नमाला महाजन, प्रिया नरवडे, सोनाली लोखंडे, संतोष गावडे, धनंजय जमदाडे, हृतिक लुनिया आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button